
नाशिक | Nashik
येत्या २६ जानेवारी रोजी नाशिक मनपाने (nashik nmc) आपल्या हद्दीत असणारे सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे...
२६ जानेवारी रोजी 'भारतीय प्रजासत्ताक दिन' (Republic Day) असल्याने या दिवशी नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने (Slaughter House) बंद ठेवण्यात येतील. त्यामुळे या दिवशी जनावरांची कुणीही कत्तल करु नये, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
तसेच या दिवशी जनावरांची कत्तल करतांना आढळून आल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी माहिती नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आली आहे.