रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण

शिक्षकांनी सहभाग घेण्याचे आवाहन
रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण

नाशिक । प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत शिक्षकांसाठी मोफत डिजीटल कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोटरीच्या माध्यमातून शिक्षक सहाय्य योजने अंतर्गत सात दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार असून या उपक्रमात १५ आयटी स्कील्स सेरिज शिक्षकांच्या ग्रुपमध्ये पाठवली जाणार आहे.

दररोज ३ आयटी कौशल्यावरील व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न या ग्रुपमध्ये पाठविली जातील.पुढील दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ, नवीन कौशल्याचा व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न या स्वरुपात ही सेरिज होणार आहे.

सहावा दिवस सरावासाठी असेल. सातव्या दिवशी एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार असून शिक्षकांना सहभागाचे इ-प्रमाणपत्र इ-मेलद्वारे पाठवले जाणार आहे. ३ ते ९ आॅगस्ट दरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे.

करोनामुळे शिक्षकांना अध्यापन करणे शक्य नसल्याने आगामी काळाचा विचार करता हे प्रशिक्षण ठेवण्यात आल्याची माहिती रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 चे लिटरसी चेअरमन सलीम बटाडा यांनी दिली.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 9422775200 या व्हाॅटस्अॅप क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग घ्यावा ,असे आवाहन प्रोजेक्ट व्यवस्थापक प्रतिभा चौधरी, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, क्लब सचिव दिलीप काळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.