बापरे! बेशिस्त वाहनचालकांकडून लोकअदालतीत 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

बापरे! बेशिस्त वाहनचालकांकडून लोकअदालतीत 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बेशिस्त चालकांवर (Unruly Motorists) शहर वाहतूक शाखेतर्फे (Traffic Division) ई-चलनमार्फत कारवाई केली जात असली तरी चालक हा दंड भरण्यास अनुत्सुक असतो. त्यांना आज (दि.२५) रोजी लोकअदालतीत (Lokadalat) उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार ८ हजार २१२ वाहनचालकांकडून ६३ लाख ३८ हजार ९५० रूपयांचा दंड बसुल करण्यात आला आहे....

दरम्यान, ई-चलन कारवाईनुसार २२ हजार ५०७ चालकांनी अद्याप हा दंड (Fine) भरलेला नव्हता. संबंधित दंड न भरलेल्या चालकांना २१ ते २४ सप्टेंबर अखेरपर्यंत दंड भरण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच दंड न भरणाऱ्यांना आज (दि.२५) जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) होणाऱ्या लोक अदालतीत हजर रहावे लागले.

शहरातील वाहतूकीस शिस्त लागावी यासाठी बेशिस्त चालकांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाते. त्यात जागेवरच दंड वसूल केला जातो तर काही प्रकरणांमध्ये ई चलनमार्फत (E-Challan) दंड केला जातो. त्यात वाहन चालक ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक कार्यालयात हजर राहून दंड भरणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात ई चलनकडे वाहनचालक दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे प्रलंबित दंडाची रक्कम कोट्यवधींच्या घरात पोहचली आहे.

थकीत वसुली (Recovery) करण्यासाठी शहर वाहतूक शाखा प्रयत्न करत असते मात्र त्यास अपेक्षीत यश मिळत नाही. वारंवार जनजागृती करूनही दंड भरला जात नसल्याने पोलिसांनी आता थकबाकी असणाऱ्या चालकांना न्यायालयात येण्याचा इशारा दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com