करोना अपडेट
करोना अपडेट|Digi
नाशिक

जिल्ह्यात करोनाग्रस्तांची सहा हजारी पार

चोवीस तासात २४६ पॉझिटिव्ह रूग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू असून शहरातील नवी उपनगरे तसेच जिल्ह्यातील नवनव्या गावात रूग्ण आढळत आहेत. आज चोवीस तासात जिल्ह्यात 264 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एकट्या नाशिक शहरातील 173 आहेत यामुळे शहरातील रूग्णांची संख्येने 3 हजार 408 झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 6 हजार 37 झाली आहे. तर नव्याने दाखल होणार्‍या संशयित रूग्णांची संख्या वाढत असून आज एकाच दिवसात जिल्ह्यातून 865 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील 5 रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 298 झाली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार जिल्ह्याभरात आज दिवसभरात एकुण 264 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील 173 रूग्ण आहेत. यात शहरातील जेलरोड, नाशिकरोड, हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, पंचवटी येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 3 हजार 408 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 83 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 1 हजार 388 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मनमाड, मोहाडी, येवला, निफाड, सटाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथील रूग्ण आहेत. आज मालेगामध्ये 8 रूग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे मालेगावचा आकडा 1105 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 136 वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज 5 जणांचा मत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 298 झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील आज 175 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 3 हजार 511 वर पोहचला आहे.

नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने तब्बल 865 संशयितत रूग्ण दाखल झाले आहेत.

यामध्ये नाशिक शहरातील 586 आहेत. जिल्हा रूग्णालय 17, ग्रामिण 199, मालेगाव 6, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 6 तर 51 गृह विलिगिरकण कक्षातील रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून 25 हजार 807 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 18 हजार 928 निगेटिव्ह आले आहेत. 5 हजार 773 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 228 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: 6037

* नाशिक : 3408

* मालेगाव : 1105

* उर्वरित जिल्हा : 1388

* जिल्हा बाह्य : 136

* एकूण मृत्यू : 298

* कोरोनमुक्त : 3511

Deshdoot
www.deshdoot.com