नाशकात आज दिवसभरात ६ हजार रुग्ण वाढले; पाच हजार झाले करोनामुक्त

नाशकात आज दिवसभरात ६ हजार रुग्ण वाढले; पाच हजार झाले करोनामुक्त
करोनामुक्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आज दिवसभरात ५ हजार ९१८ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज ५ हजार ३४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये करोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये आज ३ हजर ४१३ रुग्णांची भर पडली तर नाशिक ग्रामीणमध्ये २ हजार ३५० रुग्ण आढळून आले आहेत.

तिकडे मालेगाव मनपा क्षेत्रात मात्र अवघे ७५ रुग्ण आढळून आले आहेत तर जिल्हाबाह्य रुग्णांची संख्या आज ८० ने वाढली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजर २७२ मृत्यू नोंदविण्यात आले असून आजच्या ४६ रुग्णांच्या मृत्यूचा यामध्ये समावेश आहे. आज झालेल्या मृतांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात १७, नाशिक ग्रामीणमध्ये २८ तर जिल्हाबाह्य एका रुग्णाचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com