कळसुबाई, हरिशचंद्रगड येथे आता 'विकेंड लॉकडाऊन'

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या 40 पर्यटकांवर कारवाई
कळसुबाई, हरिशचंद्रगड येथे आता 'विकेंड लॉकडाऊन'

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोरोनामुळे नाशिक वनवृत्तातील सहाही अभयारण्य (six sanctuary in the nashik forest dept) वर्षभरापासून बंद होते. कोरोनाचा (Covid 19) आलेख खाली आल्यानंतर नाशिक वन्यजिव विभागाकडून (Wildlife Dept) (दि. 7) जुन पासून अभयारण्यावर लादलेली बंदी हटविण्यात आली. दरम्यान, वन्यजिव विभागाने ( दि.1 जुलैपासून विकेंड लॉकडाऊन (Weekend Lock down) जाहिर केला असून नियमांचे उल्लघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. कोरोनासह विना परवानगी अभयारण्याक्षेत्रात प्रवेश करणार्‍या 40 पर्यट्कांवर 20 हजारांची द्ंडात्मक कारवाई करण्यात आली आहे....

दरम्यान, रविवारी काही पर्यट्कांनी विकेंड लॉकडाउन (Weekend Lock down) असताना आणि अभयारण्यामध्ये प्रवेशबंदी असतानाही वन कर्मचार्यांवर दमबाजी करुन प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे वन्यजीव विभागाने म्हट्ले आहे. वन्यजीव विभागाने लपून सुरु असलेली मद्यविक्री बंद केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यट्कांवर द्ंडात्मक कारवाइ केली असून पर्यट्कांची गर्दी होणार नाही याकडे वन्यजीव विभागाचे लक्ष आहे. अभयारण्य सुरु झाल्यानंतर दूरवरुन पर्यट्क कळसुबाई, हरिश्चंद्र गड, भंडारदरा या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भेटी देत आहे.

मात्र, काही उत्साही पर्यट्कांकडून अभयारण्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. शनिवार व रविवार दोन्ही दिवस पर्यट्कांची मोठी गर्दी होत असल्याने अभयारण्याच्या परिसरातील ग्रामस्थांना याचा त्रास होतो आहे. गर्दी अशीच वाढ्त राहिली तर पून्हा अभयारणे बंद होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग आजारामुळे राज्यात सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असून आषाढीवारी देखील दुसर्‍या वर्षी रद्द करण्यात आली आहे.

एकीकडे धार्मिक स्थळे बंद असताना अभयारण्यामध्ये पर्यट्कांची गर्दी होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान अभयारण्यावरी बंदी उठ्ल्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळेल, यातुन आर्थिक उलाढाल होइल अशी चर्चा होती. मात्र उत्साही पर्यट्कांमुळे अभायरण्ये पून्हा बंद होण्याची शक्यता आहे.

अभयारण्यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 40 पर्यट्कांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे आणि विना परवानगी वाहन वनक्षेत्रात घालविल्याप्रकरणी या कारवाई करण्यात आलेल्या आहेत. आता शनिवार व रविवार विकेंड लॉकडाउन घेण्यात आलेला असून पर्यट्कांनी या दिवशी गर्दी करु नये

गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com