चाळीत युरिया टाकल्याने सहाशे क्विंटल कांद्याची नासाडी

चाळीत युरिया टाकल्याने सहाशे क्विंटल कांद्याची नासाडी

नांदगाव । Nandgoan
नांदगाव तालुक्यातील (Nandgoan Taluka) आझादनगर येथे एका शेतकर्‍यांच्या कांदा चाळीत (Onion Stock Market) अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी युरिया (Uria) टाकल्याने सुमारे ६०० क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे कांदा उत्पादकाला (Onion growers) १० ते १२ लाख रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, आझादनगर येथील शेतकरी भगवान स्वरूपचंद काकळीज यांनी उन्हाळी कांदा चांगला भाव मिळेल या आशेने चाळीत साठवला होता. 23 जुन रोजी रात्री कांद्याच्या चाळीत अज्ञात इसमाने युरिया मिश्रीत पाणी (Urea mixed water) टाकून कांद्याची नासाडी केली होती. याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) तक्रार दाखल (Case Filed) केली होती.

त्याबाबत चार तपास लागण्याच्या आतच पुन्हा दुसर्‍यांदा 8 जुलै रोजी रात्री उशिरा पुन्हा संशयिताने कांद्यात युरिया मिश्रीत पाणी टाकून पोबारा केला. यामुळे 600 क्विंटल कांदा सडला आहे. यात प्रथमदर्शनी आजच्या बाजारभावा प्रमाणे अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


याप्रकरणी पोलिसांत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर दुसर्‍यांदा असा प्रकार घडला नसता, असे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. परिसरातील शेतकर्‍यांनी पोलिस ठाण्यात जावून झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com