दिवभरात जिल्ह्यात केवळ साडेसहाशे पॉझिटिव्ह

०१ हजार ३४९ जणांची करोनावर मात
दिवभरात जिल्ह्यात केवळ साडेसहाशे पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह

नाशिक | Nashik

शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट येत आहे. कोरोना मुक्त होणारांचे प्रमाण वाढत असून मागील चोवीस तासात संपुर्ण जिल्हाभरात केवळ 677 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर 1 हजार 349 रूग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 60 हजार 697 चा आकडा पार केला आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत मोठी घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

आज पुन्हा पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात केवळ 677 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मृत्युमुखी पडणारांचे प्रमाण मात्र कायम असून आज 43 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 677 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या केवळ 316 इतकी आहे. नाशिक शहरातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक 96.63 टक्के इतके आहे.

ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील 350 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात केवळ 11 रूग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 80 हजार 355 इतका झाला आहे.

करोना मृत्यूचे प्रमाण कायम असून ग्रामिण भागात हे प्रमाण अधिक आहे. आज जिल्ह्यात 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील 17 रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील 21 व मालेगाव येथील 5 रूग्णांचा सामावेश आहे.

यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 4 हजार 414 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 1 हजार 227 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 1 हजार 74 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये 700 ने घट आली असून हा आकडा आता 15 हजार 244 इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com