वालदेवी धरणात बुडून सहा जणांचा मृत्यू

वाढदिवस पडला महागात
वालदेवी धरणात बुडून सहा जणांचा मृत्यू

वाडीवरहे | Vadivarhe

पिंपळद घोलपांचे जवळील वालदेवी धरणात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहिती अशी पाथर्डी फाटा येथील नऊ जणांचा ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणावर गेले होते. यावेळी फोटो काढण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. यात पाच तरुणी तर एका तरुणाचा समावेश आहे.

घटनास्थळी पोलीस पोहचले असून शोधकार्य सुरू आहे. एक मृतदेह शोधण्यास पोलिसांना यश आले असून अद्याप पाच जणांचा शोध सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com