नाशिक

सुरगाण्यात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू

करोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतसह व्यापारी संघटनेचा निर्णय

Abhay Puntambekar

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

शहरात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुरगाणा नगरपंचायतसह व्यापारी संघटनेने दि. १४ ते २० जुलैपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या कालावधित फक्त वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने सुरु असणार असून अन्य सर्व व्यावसायिक दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुरगाणा नगपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी दिली.

दरम्यान, सुरगाणा शहरात कोरोना बाधित आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाण्याचे तहसिलदार विजय सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक दिवानसिंघ वसावे , सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. दिलीप रणविर यांनी प्रत्यक्ष भेट देत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

त्यानंतर शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. यावेळी नगरसेवक भरत वाघमारे, दिपक थोरात,आब्बास शेख,रमेश थोरात, सचिन आहेर, ज्ञानेश्वर कराटे,शेवंता वळवी,अकील पठाण, सुरगाणा शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, दिनकर पिंगळे,अबु मौलाना,धर्मेंद्र पगारीया, दिपक चव्हाण,  उपस्थित होते.

नागरिकांनी शहरात गर्दी करु नये.माॅस्क न लावल्याचे आढळून आल्यास शंभर रुपये इतका दंड आकारण्यात येईल. सुरगाणा शहरात बाहेरील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेकरीताच शहरात यावे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. कोरोनाचा फैलाव रोखण्याकरीता नगरपंचायतीची यंत्रणा सज्ज आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे."

नागेश येवले. मुख्याधिकारी .

Deshdoot
www.deshdoot.com