सिन्नर : 'या' गावातील अडीच वर्षांचा मुलगा निघाला करोनाबाधित
नाशिक

सिन्नर : 'या' गावातील अडीच वर्षांचा मुलगा निघाला करोनाबाधित

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यात आज सहा करोना रुग्ण वाढले आहेत. पास्ते येथे अडीच वर्षाचा चिमुरडा, 25 वर्षाचा युवक व पन्नास वर्षाच्या महिलेला करोनाचा संसर्ग झाला आहे.

तालुक्यातील मानोरी येथे 33 व 58 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिलेला करोनाचा संसर्ग झाला आहे. या सहा रुग्णामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 344 झाली आहे.

त्यातील 266 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील करोना केअर सेंटर व नाशिक येथे 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com