सिटू पदाधिकारी, सदस्यांचे राजीनामे

सिटू पदाधिकारी, सदस्यांचे राजीनामे

सटाणा । प्रतिनिधी | Satana

येथील पालिका स्थापनेपासून कार्यरत असलेल्या सिटू संलग्न कर्मचारी संघटनेच्या (Situ affiliated staff union) सर्व पदाधिकारी व सदस्यांनी राजीनामा (Resigned) देऊन सटाणा नगरपरिषद (satana nagar parishad) आजी-माजी सेवक संघटना स्थापन केली आहे. संघटनेच्या हंगामी समन्वयकपदी सनपाचे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस (Public Relations Officer Hiralal Kapdanis) यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी नितीन बागुल यांना सिटू संलग्न कर्मचारी संघटनेच्या बरखास्तीबाबत निवेदन (memorandum) दिले आहे. सटाणा नगरपरिषदेतील (satana nagar parishad) आजी-माजी सेवकांच्या कल्याणार्थ सुभाष पाटील व पोपट सोनवणे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी विविध कार्यक्रम, आंदोलने (agitation) झालीत. त्यामुळे कर्मचार्‍यांना न्याय देखील मिळाला. कर्मचार्‍यांचा त्यांच्या नेतृत्वावर पुर्णत: विश्वास असला तरी, सर्व सदस्यांमध्ये वेगवेगळ्या विचारधारा असून सीटू विचारधारेबाबत सातत्याने संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विचारधारांचे एकत्रीकरण होण्यासाठी तसेच स्थानिक प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविण्यासाठी स्थानिकच संघटना असावी आणि आवश्यकतेनुसार स्थानिक संघटनेचे प्रतिनिधी शिखर संघर्ष समितीत पाठवावे, असा सुवर्णमध्य साधण्यासाठी आम्ही विद्यमान सिटू संघटनेच्या सदस्यत्वाचा सामुहिक राजीनामा (Collective resignation) देत आहोत. तसेच सटाणा नगरपरिषद आजी-माजी सेवक संघटना स्थापन करीत आहोत. आमच्या या नवीन संघटनेचे नेतृत्व मंडळ लवकरच कळविले जाईल. त्यामुळे चालू महिन्याच्या वेतनातून सिटू संघटनेची आमची वर्गणी कपात करू नये, अशी भूमिका पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

नव्या संघटनेच्या स्थापनेनंतर हिरालाल कापडणीस, मनोहर बोरसे, शालिमार कोर, ज्ञानेश्वर खैरनार, किशोर सोनवणे, आनंदा सोनवणे, मोहन सोनवणे, सुनिल सोनवणे, इस्माईल शेख, प्रभाकर सोनवणे, धनंजय गुंजाळ, प्रवीण नैय्या, अमोल सोनवणे, भूषण जोशी, बाळू देवरे, संजय कुलकर्णी, किरण सोनवणे, उषा बच्छाव आदींसह सर्व कर्मचार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पालिका प्रवेशद्वाराजवळ जल्लोष करण्यात आला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com