'या'कारणामुळे बहिणीनेच केला भावाचा खून

'या'कारणामुळे बहिणीनेच केला भावाचा खून

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण (Beating) करत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत त्याच्या पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृण खून (murder) केल्याची धक्कादायक घटना आज (दि. 26) शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संदीप गोंगे (45) असे मृताचे नाव असून खून केल्यानंतर आरोपी बहिण शोभा गारुडकर (55) हीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत लहान भावाचा खून (Brother's murder) केल्याची कबुली दिली. शहरातील विवेकानंद नगर क्र.2 मध्ये संदीप गोंगे हा आई व इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर (shrirampur) येथे राहणारी त्याची बहीण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला (manmad) आली होती. संदीप व्यसनी होता व तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. येथे आल्यावर त्याचा त्रास वाढला होता.

दररोज काहीतरी कुरापत काढून तो तीला शिवीगाळ करून मारहाण देखील करायचा. करोना (corona) काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असतांना संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी वाढला होता. आज दुपारी ती जेवण करीत असतांना संदीपने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शोभाने टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. घाव वर्मी लागल्यामुळे संदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

संतापाच्या भरात आपल्याकडून मोठी चूक झाल्याची जाणीव होताच शोभाने थेट पोलीस ठाणे गाठून लहान भावाचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळाताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे (Deputy Superintendent of Police Sameer Singh Salve), सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते (Assistant Inspector Pralhad Gite), उपनिरीक्षक पी.डी. सरोवर (Sub-Inspector P.D. Sarovar) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शोभाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल (Filed a murder charge) केला आहे. रागावर नियंत्रण न ठेवल्यास नात्याला काळिमा फासणारी घटना कशी घडते; हे आज घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे.

Related Stories

No stories found.