लॉकडाउनच्या आदल्या दिवशी सिन्नरकरांची तोबा गर्दी

लॉकडाउनच्या आदल्या दिवशी सिन्नरकरांची तोबा गर्दी

किराणा, भाजीपाला आणि पेट्रोल खरेदीसाठी लोक रस्त्यावर

सिन्नर । प्रतिनिधी

जिल्हाभरात प्रशासनाकडून बुधवार (दि. 12) पासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी मंगळवारी किराणा, भाजीपाला आणि पेट्रोल खरेदीसाठी सिन्नरकरांनी तोबा गर्दी केली होती.

शहराच्या मुख्य बाजारपेठेसह सरदवाडीरोड, वावी वेस भागात तसेच आडवा फाटा येथील भाजीबाजारात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या दहा दिवस पुरेल इतका भाजीपाला, किराणा तसेच पेट्रोलची तयारी करतांना प्रत्येकजण दिसून येत होता.

लॉकडाउनच्या आदल्या दिवशी सिन्नरकरांची तोबा गर्दी
नाशिक लॉकडाऊन : पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी सकाळपासून लागल्या रांगा

मात्र यात सर्वत्र नियमांचा भंग होतांना दिसून आले. सर्वत्र सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याने लॉकडाऊनच्या आदल्या दिवशीच संसर्ग वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. शहरासह ग्रामीण भागीतल मोठ्या गावांत देखील सकाळी 11 वाजेपर्यंत किराणा दुकानांवर गर्दी दिसून आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com