सिन्नरकरांना होणार दररोज पाणीपुरवठा

सिन्नरकरांना होणार दररोज पाणीपुरवठा

कडवा योजनेच्या एक्स्प्रेस फीडरची चाचणी

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर शहरासाठी महत्वकांक्षी ठरलेल्या कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी 24 तास वीजपुरवठा होणार्‍या एक्स्प्रेस फीडरसह वीजपंपांची चाचणी सुरू झाली असून शहराला आता दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहीती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली.

कडवा पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येऊनही वीजपुरवठ्याअभावी पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्य होते. त्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस फीडरची गरज होती. हे काम दोन दिवसांपूर्वीच पूर्णत्वास आले.माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेतील विविध अडथळे दूर करण्यात आले. मुख्याधिकारी संजय केदार, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेंत वाजे, नगरसेवक प्रोद चोथवे, शैलेश नाईक, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, गोविंदराव लोखंडे, श्रीकांत जाधव, विजय जाधव, रूपेश मुठे, विजया बर्डे, मंगला शिंदे, सुजाता भगत, सुजाता तेलंग, प्रणाली गोळेसर, ज्योती वामने, प्रतिभा नरोटे आदींनी योजनेतील विविध अडथळे दूर करण्यासाठी मेहनत घेतली.

योजना पूर्णत्वास गेल्यानंतर ती पुरेशा क्षमतेने चालवण्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस फीडरची गरज होती. तोपर्यंत एसएबीटी एक्सप्रेस फीडरवर वीज जोडणी करून 450 अश्वशक्तीचा एक पंप सुरू करण्यात आला होता. शहराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी दोन पंप एकाचवेळी सुरू ठेवणे गरजेचे होते. मात्र स्वतंत्र फीडर नसल्याने केवळ एक पंप सुरू होता. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते.

दरम्यान एक्स्प्रेस फीडर व एकाचवेळी दोन पंप चालवून चाचणी सुरू करण्यात आली आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी पाणी व्यवस्थापन राबवावे लागणार आहे. पुरेसे पाणी उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहीती नगराध्यक्ष डगळे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com