सिन्नरला कायमस्वरुपी पाणी पुरवठा देणार

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत जलसंपदामंत्री पाटील यांचा शब्द
सिन्नरला कायमस्वरुपी पाणी पुरवठा देणार

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

विधानसभा निवडणूकीत Assembly elections सिन्नर तालुक्याने Sinnar Taluka शरद पवार यांना साथ देत आमदार निवडून दिला. त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी तालुक्याचा शेवटचा प्रश्न असणार्‍या, कडवाचे पाणी लिफ्टद्वारे देवनदीत टाकण्याची योजना पूर्ण करुन या दुष्काळी तालुक्याला कायमस्वरुपी पाणी permanent water supply दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा शब्द राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील State Water Resources Minister and NCP State President Jayant Patil यांनी दिला.

ना. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी संवाद यात्रेचे तालुक्यात आगमन झाल्यानंतर नगर परिषदेच्या शाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, श्रीराम शेट्ये, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

सिन्नर तालुक्याने नेहमीच दुष्काळीचा सामना केला आहे. वैतरणेतून मुकण्याकडे 10 टी. एम.सी. पाणी नेण्याचे टेंडर निघाले आहे. वैतरणेतून कडवात व कडवातून देवनदीच्या खोर्‍यात पाणी आणण्याच्या प्रकल्पाचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प अहवाल हातात येईल आणि त्यानंतर तालुक्यासाठी 7 हजार द.ल.घ.फूट पाणी देण्याचा या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल.

त्यातील 4 हजार द.ल.घ.फूट पाणी उद्योगासाठी तर 4 हजार द.ल.घ.फूट पाणी कृषीसाठी आरक्षित ठेवणारच. सन 2021 पर्यंत हे काम बरेच पूर्ण होईल. त्यासाठी कितीही उंचीवर पाणी न्यावे लागले तरी त्यासाठी मागे हटणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मांजरपाड्याच्या यशामुळे वळण बंधार्‍यांचे महत्व अधोरेखित झाले असून आघाडी सरकारने राज्यभरात ‘वळण बंधार्‍यांच्या कामांना वेग देण्याचा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात 150 कोटीच्या पाणी पुरवठा योजना आपण आणल्या. शहरासाठी 100 कोटीची योजना आणली. ज्या योजना बंद पडल्या. त्यांच्यासाठीही निधी आणला. त्यामुळेच गेल्या 2 वर्षांपासून तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याचे आ. कोकाटे म्हणाले. महिनाभरात शहा येथील 132 केव्हीचे विज केंद्र सुरु होईल आणि तालुक्याच्या विजेचा प्रश्न मिटेल. विज, पाणी आणि रस्ते याकडेच आपण लक्ष दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच आपण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणू शकलो. त्यामुळे हा तालुका राष्ट्रवादीचा तह्यात बालेकिल्ला राहील अशा पध्दतीने यापूढे काम झालेले दिसेल असा विश्वास त्यांनी ना. पाटील यांना दिला.

तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी तालुक्याचा आढावा घेत पक्षाच्या सर्व सेलच्या नियुक्त्या महिनाभरात पूर्ण करण्यात येतील असा शब्द दिला. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी सुभाष कुंभार यांना नियुक्तीचे पत्र ना. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. बाजार समितीचे माजी उपसभापती संजय आव्हाड, मनसेचे शहराध्यक्ष नितीन लहामगे यांच्यासह अनेकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. चाकणकर, सिमंतीनी, कोंडाजीमामा यांचीही यावेळी भाषणे झाली.

Related Stories

No stories found.