राज्यात सिन्नर मुख्य केंद्र होणारः गोडसे

राज्यात सिन्नर मुख्य केंद्र होणारः गोडसे

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

येणार्‍या काळात सिन्नर तालुका (sinnar taluka) महाराष्ट्रातील (maharashtra) मुख्य केंद्र (Main center) होणार असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे (mp hemant godse) यांनी केले.

माळेगाव (malegaon) फाट्याजवळ बायपासवर 28 कोटी खर्च करून बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे (flyover) भूमिपूजन (bhumipujan) केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजाभाऊ वाजे (rajabhau waje) होते. व्यासपीठावर भारत कोकाटे, संजय सानप, उदय सांगळे, राजेश गडाख, माजी सभापती सुलोचना चव्हाणके, तस्लीम बोहरी, श्रध्दा नरोडे, नामदेव शिंदे, सुनीता सानप उपस्थित होते.

बायपासवर होणारी वाहतूक कोंडी (traffic jam), वारंवार होणारे, छोटे-मोठे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची सिन्नरकर नेहमीच मागणी करत होते. त्यासाठी केंद्रातील रस्ते वाहतूक खात्याकडे (Road Transport Department) ना. नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्याकडे पाठपुरावा करून 28 कोटींचा निधी (fund) मंजूर करून आणला आहे. सिन्नर-घोटी महामार्गावरील (Sinnar-Ghoti Highway) खड्ड्यांमुळे या महामार्गावरून जाण्यास वाहन चालक नाखूष असायचे. 40 कोटी मंजूर करून आणत हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात यश आले आहे. सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 900 कोटी मंजूर करून आणले.

अजून वर्षभरात या रस्त्याचे काम पूर्ण होईल. रस्त्यालगत स्वतंत्र पालखी रोडही तयार होत आहे. माळेगाव फाटा ते गुरेवाडी बायपास या सिन्नर शहरातून जाणार्‍या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी 14 कोटींचा निधी मंजूर करून आणला असून लवकरच या कामाचे ही भूमिपूजन (bhumipujan) करण्यात येणार आहे. सिन्नर-नाशिक महामार्गावरील (Sinnar-Nashik Highway) मोहदरी ग्रामस्थांची होणारी अडचण लक्षात घेऊन तेथे अंडरपास (Underpass) मंजूर करून आणला असून लवकरच या कामाचेही भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे खासदार गोडसे म्हणाले.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरची (Delhi-Mumbai Industrial Corridor) उभारणी करण्याबरोबरच या कॉरिडोरसह संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी अप्पर वैतरणातून कडवा धरण व तेथून देवनदी, भोजापूर धरणासह तालुक्यातील सर्व नद्या वाहत्या करण्याच्या प्रकल्पाचा अहवालही राज्य शासनाकडे गेला आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के तालुका सुजलाम सुफलाम होईल. तालुक्यात होणारी नाशिक-पुणे रेल्वे, समृध्दी महामार्ग, सुरत-हैदराबाद महामार्ग, शिर्डी महामार्गामुळे राज्यातला विकसित तालुका म्हणून सिन्नरला ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उदय सांगळे यांनी प्रास्ताविक केले. पिराजी पवार यांनी सूत्रसंचलन केले. आभार माळेगावचे सरपंच केशव सांगळे यांनी मानले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, शहरप्रमुख गौरव घरटे, अनिल सरवार, अंबादास कदम, नामदेव शिंदे, रमेश नागरे, शैलेश नाईक, रामनाथ पावसे, गोविंद लोखंडे, गणेश तटाणे, अशोक डावरे यांच्यासह शिवसैनिक, माळेगाव चिंचोलीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार उद्योग महोत्सव भरवणार

नाशिकला इलेक्ट्रॅनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजुरी मिळवली असून शहराच्या आजूबाजूला 100 एकर क्षेत्राचा त्यासाठी शोध सुरू झाला आहे. बेरोजगार युवकांना उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळावी, त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, उद्योजकांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देता यावा यासाठी लवकरच खासदार उद्योग महोत्सव भरणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com