Dr. Ajinkya Vaidya
Dr. Ajinkya Vaidya| Primary Health Center Medical Officer
नाशिक

सिन्नर : वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य यांचे निधन

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात होते कार्यरत...

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर | प्रतिनिधी

वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजिंक्य बाळासाहेब वैद्य (वय ३२) यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी 8 वाजता सिन्नर येथील शिवाजीनगर भागातील घरी छातीत दुखू लागल्याने त्यांना नाशिक येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.

करोना संसर्ग काळात वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ते अतिशय उत्कृष्ट काम करत होते. वावी परिसरातील गावांमध्ये करोना बाधित सापडल्यानंतर परिसरातील सर्वेक्षणासह आरोग्य सेवा पुरवण्याचे काम आपल्या सहकाऱ्यांसह ते करत होते. गुरुवारी (दि. ३०) रात्री उशीरापर्यंत त्यांचे हे काम सुरूच होते.

डॉ. अजिंक्य हे बीएसएनएल मधील सेवानिवृत्त अधिकारी दिवंगत बाळासाहेब वैद्य यांचे पुत्र तर दिवंगत सुनील वैद्य यांचे पुतणे होते. ३ वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व २ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com