सिन्नर : तीन दिवसांत तीन मृत्यू

नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद
सिन्नर : तीन दिवसांत तीन मृत्यू

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सलग तीन दिवसांत शहरात तीन रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून शहरातील बाधितांची संख्या वाढतच आहे.काल समर्थ नगरमधील ४६ वर्षीय पुरुषाचा नाशिकच्या मविप्र रुग्णालयात मृत्यू झाला तर शहरासह तालुक्यात काल २४ नव्या रुग्णांची भर पडली. तर नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका नाशिक येथे राहणार्‍या सेवकाला करोनाचा संसर्ग झाल्याने हे आरोग्य केंद्र बंद करण्यात आले आहे.

सोमवारी (दि.२७) सरदवाडी रस्त्यावरील ८४ वर्षीय ज्येष्ठाचा नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मंगळवारी (दि.२८) मध्यरात्री सोनार गल्लीतील ८० वर्षीय ज्येष्ठाचा नाशिक येथीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. काल (दि.२९) समर्थ नगर येथील ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे करोनाने मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या १५ झाली असून काल संध्याकाळपर्यंत तालुक्यात २४ नव्या रुग्णांची भर पडली.

त्यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. त्यात सोनांबे येथील ६, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील ५, पाटपिंप्री, वडझिरे, वडगाव-सिन्नर, शहा, भाटवाडी, नांदूरशिंगोटे व वडगाव पिंगळा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२६ झाली आहे. त्यातील ३९९ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. तर ११५ रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चार दिवसांपूर्वी ५३ वर्षीय सेवकाला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. दोन दिवसांपूर्वी हा सेवक बाधित असल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ वैद्यकीय अधिकार्‍यांसह १७ सेवकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करण्यात आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com