सिन्नर: शोभायात्रेने पाडव्याची रंगत; दोन वर्षांनतर मिरवणुक

सिन्नर: शोभायात्रेने पाडव्याची रंगत; दोन वर्षांनतर मिरवणुक

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

कोरोनाच्या (corona) कालखंडात दोन वर्षे निघू न शकलेली नववर्ष स्वागताची शोभायात्रा (pageant) आज (दि.3) निघाल्याने सिन्नरकरांची (sinnarkar) सकाळ शुभमय झाली. सांस्कृतिक मंडळाने यंदा शहरातून जल्लोषात यात्रा काढत विविध उपक्रम राबवून नागरिकांना पाडव्याच्या (gudipadva) शुभेच्छा दिल्या.

सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात वंदे मातरम संघटनेने तयार केलेल्या गगनचुंबी गुढीची उभारणी करुन विधीवत पूजन करण्यात आले. यात्रेच्या सुरुवातीला गणेशाच्या सजवलेल्या पालखीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यानंतर शहरातून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गंगावेस, गणेश पेठ, शिवाजी चौक, तानाजी चौक, गावठा परिसरातून नर्मदा लॉन्सवर मिरवणुकीचा (Procession) समारोप झाला. फगवा फेटा व नऊवारी साडी परिधान केलेल्या महिला दुकाची चालवत पालखीच्या पुढे सहभागी झाल्या होत्या.

यानंतर पाठीमागे राजगर्जना या ढोल पथकाने सुरेल वादन करुन सिन्नरकरांची मने जिकंली. ढोल पथकात मुलींसह महिलांचाही समावेश होता. महिलांनी ठिकठिकाणच्या चौकात रिंगण करत विविध नृत्य सादर केले. काही महिलांनी फुगडीचे फेर धणले. त्यांच्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वेशभुषा परिधान केलेले शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्यासह महिलांनी घोड्यावर स्वार होत मिरवणूकीत भाग घेतला. प्रा. राजाराम मुंगसे यांनी मिरवणुकीत पोवाडे व विविध गीते सादर केली. यावेळी संभळ व पिपाणी वादकांच्या तालावर सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारीही थिरकताना दिसून आले.

वासुदेवाच्या गीतांवर महिलांना ठेका धरत रिंगण करुन नृत्य केले. विविध शाळांच्या विद्यार्थीनींनी मिरवणुकीत भाग घेत लेझीम सादर केली. मिरवणूकीत लोकनेते बाळाजी वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक दोरीवरील प्रात्यक्षिके सादर केली. शहरातील विविध भजनी मंडळांनी मिरवणूकीत भाग घेत भजने सादर केली. या मंडळात चिमुकल्या टाळकर्‍यांनी सर्वांचे लक्ष वेधले. चौकाचौकात नागरिकांंकडून सडा-रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करुन मिरवणुकीचे स्वागत केले जात होते.

सिन्नर पोलिसांकडून मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, पुंजाभाऊ सांगळे, मविप्र संचालक हेमंत वाजे, उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगरसेवक प्रमोद चोथवे, मनोज भगत, प्रकाश नवसे, मनोज भंडारी, प्रा. जावेद शेख, डॉ. महावीर खिंवसरा, चंद्रशेखर कोरडे, मनीष गुजराथी यांच्यासह मंचाचे व वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com