
सिन्नर | विलास पाटील | Sinnar
नाशिक जिल्हा (nashik district) मराठा विद्या प्रसारक समाजाच्या (Maratha Vidya Prasarak Samaj) पंचवार्षिक निवडणुकीत (election)
तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक हेमंत वाजे (Director Hemant Waje) व माजी संचालक कृष्णाजी भगत या दोन सख्ख्या मित्रांमध्येच चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्याचे आ. माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) हे देखील अध्यक्षपदाच्या लढतीत उतरण्याची शक्यता असून संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा संचालका व्यतिरिक्त अन्य जागेवर उमेदवार उभा दिसणार आहे.
पाच वर्षांपूर्वी निवडणूक (election) झाली तेव्हा नीलिमा पवार यांच्या पॅनलकडून कृष्णाजी भगत यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी आ. कोकाटे यांनी पॅनलला पाठिंबा देण्याच्या बदल्यात भगत यांच्या उमेदवारीला विरोध केला. भगत यांचे स्व. डॉ. वसंत पवार (Dr. Vasant Pawar) यांच्याशी असणारे नाते, जवळीक याला तिलांजली देत नीलिमाताईंनी भगत यांना उमेदवारी नाकारत भगत सांगतील तो उमेदवार देण्याची तयारी दाखवली. त्यावेळी भगत आणि हेमंत वाजे यांची मैत्री सर्वश्रुत होती.
सार्वजनिक वाचनालय, लायन्स क्लबसह (Lions Club) विविध संस्थांवर राम-लक्ष्मणाची ही जोडी विराजमान होती. वाजे सावलीसारखे भगत यांच्यासोबत असायचे. उमेदवारी दुसर्या कुणाला देण्यापेक्षा वाजे यांना देण्याचा विचार त्यामुळे भगत यांनी केला. नवख्या वाजे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या विजयासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न भगत यांनी केले. वाजे विजयी झाले. मात्र, नीलिमाताईंसह पॅनलचा विजय काठावरचा ठरला. सिन्नरच्या (sinnar) मतदानाने पॅनलला खरे तर तारले. मात्र, भगत यांनी आपल्या विरोधात काम केले असा समज नीलिमाताईंनी करुन घेतला तो शेवटपर्यंत.
म्हणायला भगत लोकनेते शंकराव बाळाजी वाजे विद्यालयाच्या (Shankarao Balaji Waje Vidyalaya) शालेय समितीचे अध्यक्ष झाले. मात्र, संस्थेच्या तालुक्यातील इतर कार्यक्रमांमधून भगत यांना बाजूला सारण्यात आले. वरच्या पातळीवरुनच हे सगळे घडल्याची खात्री असल्याने भगत यांनी कधीही वाजे यांच्याबाबत गैरसमज करुन घेतले नाहीत की त्यांच्या संबंधात अंतरही पडले नाही. भगत यांच्याकडची रोजची बैठक तेवढी कमी झाली. वाजे यांनी संचालकपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे काम केले. सिन्नर महाविद्यालयात अनेक नवे कोर्सेस मिळवले.
बास्केट बॉलचे मैदान (Basketball court) तयार केले, विविध गार्डन्स उभारल्या, जॉगिंग ट्रॅकचे (jogging track) काम सुरु केले. सायाळे, मीठसागरे, कोमलवाडी शाळेच्या इमारतींचे जोरदार उद्घाटने केली. होरायझन या सी. बी. एस. सी. अभ्यासक्रमाच्या स्कूलला परवानगी मिळवत बदलत्या काळात सिन्नरकरांना नवा पर्याय उपलब्ध करुन दिला. कोनांबेच्या शाळेच्या जागेचा प्रश्न सोडवत चार वर्ग खोल्यांच्या कामाला प्रारंभ केला. सोनांबे, मनेगावला विविध सुविधा मिळवून दिल्या. तालुक्यातल्या सर्व शाळांना संरक्षक भिंती (Protective walls for schools) बांधण्यास त्यांनी सुरुवात केली.
तालुक्यातही संस्थेचे एक महाविद्यालय असावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील दोन्ही औद्योगिक वसाहतींचा (Industrial estates) विचार करता एखादे व्यवसायिक शिक्षण (Vocational education) देणारे महाविद्यालय सुरु करावे असाही त्यांचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या काळात सभासदांसह तालुक्यातील सर्वसामान्यांनाही संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून सेवा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भुमीका बजावली. कोरोनाचे (corona) स्वॅब तपासणी केंद्र सवलतीच्या दरात सिन्नरमध्ये सुरु केल्याने त्यांच्यासह संस्थेच्या रुग्णालयाचे नावही घरोघर पोहोचले.
संस्थेच्या सभासदांना मानसन्मान देण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. त्यांच्या अडचणी सोडवल्या. रिकाम्या हाताने कुणालाही परत पाठवले नाही. शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या संस्थेच्या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवतच त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत नीलिमाताईंनी वाजे यांची उमेदवारी नक्की केल्याचे मानले जात आहे. संस्थेचे माजी तालुका संचालक राजेंद्र नवले यांनाही निलिमाताईंच्या पॅनलकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात तालुक्यातल्या जास्तीत जास्त शाळांना इमारती मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. माजी आ. स्व. शंकरराव नवले बाबा हे त्यांचे वडील असून त्यांच्याच विचारांवर श्रद्धा असणारे राजेंद्र हेही आपल्या कर्तृत्वावर उमेदवारी मिळेल असे गृहीत धरुन प्रचारासाठी फिरत आहेत.
पाच वर्षांपूर्वी कोकाटे यांच्या विरोधामुळे उमेदवारी नाकारली तरी पुढच्या वेळी तुम्हालाच उमेदवारी देऊ असा शब्द नीलिमाताईंनी दिला होता असा भगत यांच्या दावा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात संचालक मंडळाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे भगत दुखावले गेले. संस्थेच्या व्यासपीठावरही ते फारसे दिसले नाहीत. मात्र, अॅड. नितीन ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण होत गेली. अॅड. ठाकरे यांची जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच भगत यांंनी त्यांचा सिन्नरला भव्य सत्कार केला.
त्यामुळे भगत यांना ठाकरे यांच्या पॅनलकडून उमेदवारी मिळेल असेही संकेत मिळू लागले व त्यांनी जिल्हाभर प्रचाराची फेरीही पूर्ण केली. संपूर्ण जिल्हाभर पसरलेले नातेवाईक व मित्रपरिवार ही त्यांची ताकद आहे. सन 83 पासून जवळपास 25 वर्षे संचालक म्हणून केलेल्या कामाच्या आधारावरच ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. संस्थेला वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी स्व. डॉ. पवार यांच्यासोबत उपोषणाला बसणार्यांमध्ये भगत होते. मात्र, आता त्याच महाविद्यालयाच्या रुग्णालयात संचालक मंडळासह सभासदांनाही मानसन्मान मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे. संचालक मंडळात जवळपास पाच संचालक डॉक्टर असताना कोरोनाच्या काळात यातील कोणालाही रुग्णालयाच्या समित्यांमध्ये सामावून घेण्यात आले नाही.
ठराविक संचालकांनाच सन्मान मिळतो. नीलिमाताईंच्या मुलाचा व मुलीचा प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप वाढल्याचाही त्यांचा आरोप आहे. यापूर्वी आठ-आठ तास चालणार्या संचालकांच्या बैठका आता अर्ध्या तासात आटोपत आहेत. शाळांच्या इमारती उभ्या राहव्यात यासाठी सोनांबेसारख्या शाळांमधील शिक्षकांनी आपल्या कार्यकाळात एक महिन्याचा पगार दिला होता. स्व. भगवंतराव वाजे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनीही सिन्नर महाविद्यालयासाठी 14 एकर जमीन व 11 हजारांची देणगीही दिली होती. स्व. शंकरशेठ शेठ वाजे यांनी सिन्नर शहरातील मोक्यावरची साडेपाच एकर जमीन संस्थेला दिली. मिठसागरेत पी. बी. कथलेंनी शाळेसाठी जागा दिली.
सायाळेत डी. एस. शिंदेसारख्या भुमीपूत्रानेे पंधरा वर्षांपूर्वी 5 लाखांची देणगी दिली. त्यातून शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या. मात्र, या देणग्या देणार्यांना, सभासदांना योग्य मानसन्मान मिळत नाही. होरायझन स्कूल आता उभी राहिली असली तरी मराठा समाजाची ही जागा संस्थेला मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले. त्या जागेत राहणार्या 22 कुटुंबांना पर्यायी जागा देत जागा मोकळी केली. या जागेला दगडी संरक्षण भिंत बांधली. तालुक्यातल्या सर्व शाळांना प्रशस्त इमारती बांधण्याचे काम आपल्याच कार्यकाळात झाल्याचा त्यांचा दावा आहे. संस्थेच्या सभासदांना नेहमी सन्मानाने वागणूक दिल्यामुळेच त्यांच्या आग्रहाखातर आपण आयुष्यातली शेवटची निवडणूक लढवत असल्याचा त्यांचा दावा आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सिन्नर वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाणके हेही अॅड. ठाकरे यांच्या पॅनलकडून इच्छुक असून गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये इतरांसाठी आपण नेहमीच थांबत आलो. मात्र, आता इतरांनी थांबून आपल्याला मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आ. कोकाटे यांचे निष्ठावान समर्थक असणारे चव्हाणके संपूर्ण जिल्ह्यातील सभासदापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मागच्या निवडणुकीत ठाकरे यांच्या पॅनलकडून उमेदवारी केलेले अशोक मुरकुटे हेही ठाकरे पॅनलकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. शेवटी रिंगणात कोण उतरते हे दोन दिवसातच समजणार आहे.
आ. कोकाटे अध्यक्षपदाचे उमेदवार?
सिन्नर तालुक्यात जेमतेम 430 सभासद आहेत. निफाड 2700, मालेगाव 750, सटाणा 1000, दिंडोरी 800, कळवणमध्ये 500 हून अधिक सभासद असताना सिन्नरला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी अशी आ. कोकाटे यांची इच्छा आहे. नीलिमाताईंकडे उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच ते अॅड. ठाकरे यांच्या गोटात सामील झाले. कोकाटे यांनी तालुका दूध संघात आपल्या समर्थकांचा दोन दिवसांपूर्वी मेळावा घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे समजते.
कोकाटे यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवायची असून संस्थेचा नाशकात राहणारा जवळपास 5 हजारांचा सेवक वर्ग, नाशकात राहणारे हजारो सभासदांपर्यंत पोहोचण्याची संधी म्हणून ते उमेदवारी करीत असल्याची चर्चा आहे. अनेक वर्ष जिल्हा बँकेचे नेतृत्व करणार्या कोकाटे यांना अॅड. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे शक्य होईल का? कृष्णाजी भगत व त्यांचे सख्य संपूर्ण तालुक्याला माहिती असून हे दोघेही सोबत प्रचाराला फिरणे सभासदांना किती भावेल हाही प्रश्नच आहे.