
सिन्नर | विलास पाटील | Sinnar
वैदुवाडी (Vaiduvadi) आणि मळहद्दमधील कार्यकर्त्यांच्या हाणामारीत वैदुवाडीतील शंकर माळी या मृत्यू (death) झाला.
किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीत (fight) एकाचा मृत्यू होणे ही संपूर्ण शहरासाठी धक्कादायक अशी बाब आहे. अशा घटनेनंतर दुसरे एखादे शहर असते तर शहराची शांतता भंग पावली असती. मृत झालेल्या युवकाच्या कुटुंबाने संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी करणे गैर म्हणता येत नाही.
मात्र, मयत शंकरच्या कुटुंबियांनी, वैदुवाडीतील समंजस त्यासाठी कुणासही वेठीस धरले नाही. पोलिसांनी, त्यातल्या त्यात उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनी सर्वांची समजूत घालत अंत्यविधीसाठी सर्वांना राजी केले. शांततेत अंत्यविधी पार पडला आणि शहराची शांतताही भंग पावली नाही. त्यासाठी मयत शंकरचे कुटुंबीय, वैदुवाडीतील समंजस युवक व स्वतः तांबे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मोटारसायकलला कट मारल्याचा राग वैदुवाडीतील काही युवकांनी मळहद्दीतील एका युवकाला मारहाण (beating) केली. त्याचा बदला घेण्यासाठी मळहद्दीतील पाच-पन्नास युवकांनी थेट वैदुवाडीत जाणे आणि वैदुवाडीतील समाजाची बैठक आटोपती घेत तेथील रहिवाशांनी मळहद्दीतील युवकांना कोंडीत पकडणे हा सर्व सिनेमात शोभावा असा प्रसंग आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतर शंकर माळी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला कोणी केला व त्यात कुठले हत्यार वापरले गेले हे पोलिसांच्या चौकशीतून बाहेर येईलच. मात्र, दोन-तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही शंकरचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना (doctor) यश आले नाही हे वास्तव आहे. किरकोळ कारणासाठी एका युवकाचा नाहक बळी गेला. सिन्नर शहराच्या (sinnar city) लौकिकाला काळिमा फासणारी अशी ही घटना आहे.
सध्याच्या युवकांना राग फार लवकर येतो. अपमान झाला तर तो त्यांच्या जिव्हारी लागतो आणि त्यानंतर बदला घेण्याच्या भावनेतून नको त्या घटना घडतात. त्यानंतर काय यातना भोगाव्या लागतात आणि कोणा-कोणाला भोगाव्या लागतात याचा सारासार विचार हे युवक करत नाहीत आणि स्वत:सह इतरांनाही, त्यांच्या कुटुंबियांनाही अडचणीत आणतात. शहरात घडलेला हा प्रकारही असाच प्रतिशोध घेण्याच्या भावनेतून झाला. अर्थात इतरही कारणे आहेत. सिन्नर शहरात यापूर्वी लोंढे गल्ली, गावठा, मळहद्द अशा दादा गँग होत्या. एकमेकांची डोकी फोडताना ते शहरालाही वेठीस धरायचे. त्यातून त्यांची एक दहशत एक काळ सिन्नरमध्ये होती. त्यांच्यामध्ये पडण्याची कुणी हिंमत करत नव्हते.
काळाच्या ओघात आपापसातल्या या हाणामारींमध्ये आपण आपलेच नुकसान करतो आणि पोलीस ठाणे, न्यायालयाच्या फेर्यात हे सत्य सर्वांना समजले. त्यामुळे मधली अनेक वर्षे अशा हाणामार्या शहरात फारशा काही घडल्या नाहीत. उलट सारेच गुण्यागोविंदाने राहत असल्याचे, आनंदात सारे सण-उत्सव साजरे करत असल्याचे अनेक वर्षांपासून बघायला मिळत आहे. सिन्नर शहराला तसा दंगलीचा (riot) फारसा इतिहास नाही. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (election) हेमंत वाजे यांनी हरिभाऊ लोंढे यांचा पराभव केल्यानंतर पळापळ झाली होती. मात्र, पोलिसांसह राखीव पोलीस दलाने तातडीने हालचाल करत पसरू पाहणारी ही दंगल तातडीने अटोक्यात आणली होती. कुरणे गल्लीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रात्रीच्या वेळी विटंबना झाल्यानंतर शहरात दंगल झाली होती.
अगदी नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरण्यापासून काही वाहनांना आगी लावण्याचाही प्रयत्न संतप्त शिवभक्तांकडून झाला होता. अनेकांनी तर आपल्या फोटोही काढले होते. याच फोटोंचा आधार घेऊन पोलिसांनी त्यानंतर संशयितांची ज्या पद्धतीने धरपकड सुरू केली होती ते पाहता दंगलीच्या काळात मस्तीने वागणार्या सर्वांचीच मस्ती उतरली होती. दंगलीचे नेतृत्व करणार्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अनेक दिवस शहरातून गायब व्हावे लागले होते.
जामीन मिळण्यात अपयश आल्यानंतर पोलिसांचा त्यांना मिळालेला पाहुणचार पाहिल्यानंतर दंगलीत घेण्याचा विचार शहरातील कुणासही पुन्हा अनेक वर्षे शिवला नव्हता. नाही म्हणायला दोन वृत्तवाहिन्यांच्या मालकांच्या वादात एकदा सिन्नर थोडेसे पेटले होते. त्यात दोघा मालकांसह त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत काय हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या हे सर्व सिन्नरकरांनी पाहिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नर शहर शांतच होते.
काही वर्षांपूर्वी वैदू काही युवकांची दादागिरी वाढू लागल्याने काहीकाळ शहरातील शांतता थोडी भंग पावली होती. मात्र, स्वतः हरिचंद्र लोंढे यांनी सर्वसामान्य सिन्नरकरांसह पोलिसांच्या सहाय्याने ही दादागिरी मोडून काढल्याने शहराची शांतता अबाधित राहिली होती. वैदुवाडीतील काहींचा व्याजाने पैसे वाटणे हा मुख्य व्यवसाय बनला आहे. व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून अधून-मधून वैदुवाडीतल्या काही ठराविक युवकांच्या चर्चा शहरात होत असते.
त्यातून काहींना मारझोडही होते. अर्थात काही युवकांमुळे संपूर्ण समाजाला दोष देणे योग्य नाही. मात्र, सिन्नरकरांच्या मनात वैदू समाजातील वाढणार्या दादागिरीबाबत थोडी-थोडी चीड निर्माण होत होती. परवाच्या घटनेने मनात दडलेली चीड बाहेर आली. मळहद्दीतील युवकाच्या मोटारसायकलने कट मारल्याचा राग आल्याने वैदुवाडीतील काही युवकांनी त्या युवकाला बेदम केली.
मळहद्दीतला युवक असतानाही त्याला मारहाण होते आणि आपण गप्प बसायचे का? असे झाले तर आपल्याला गंगावेशीत जाणेही मुश्किल होईल, ही भावना मळहद्दीतल्या युवकांच्या मनात आली आणि विळ्या-भोपळ्याचे नाते असणारे मळहद्दीतील दोन गट बदला घेण्यासाठी एकत्र आले. मळहद्दीत एक गट आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले या प्रमुख तर माजी आमदार राजाभाऊ गटाचे ज्ञानेश्वर गाडे काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बनले आहेत.
मळहद्दीतील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी मारहाण करणार्यांचा वैदुवाडीत शिरून शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या कसा अंगलट आला आणि त्यात काय काय घडले हे सर्वांना कळले. मयत शंकर माळी यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीत गाडे यांचे भाऊ अनिल गाडे या घटनेत जखमी आहेत), विठ्ठल उगले यांचे बंधू पप्पू उगले यांच्यासह काही युवकांची नावे दिली आहेत. त्यात स्वतः ज्ञानेश्वर गाडे यांचेही नाव देण्यात आल्याचे समजते.
मारहाणीत ज्ञानेश्वर यांचा समावेश होता की नाही हे पोलीस तपासात समोर येईल. मात्र, त्यांचे नाव मारणार्यांच्या यादीत यावे यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याची चर्चा मिळत आहे. त्याचवेळी वैदुवाडीतील आमदार कोकाटे समर्थकांची नावे मळहद्दीतील जखमी युवकांकडून येऊ नयेत यासाठी याच ‘काहींनी’ दबाव तंत्राचा वापर केल्याचेही ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे वैदुवाडीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
मयत शंकर शिवसैनिक होता. एका गटाला वाजवताना दुसर्या गटाची कशी जिरवता येईल असा काहींचा केबिलवाणा प्रयत्न यानिमित्ताने बघायला मात्र, वैदू समाजाने सामंजस्याची भूमिका घेतली. रागाच्या भरात एखादे पाऊल उचलले असते तर या समाजाबद्दल सिन्नरकरांच्या मनात असलेल्या भावनेवर शिक्कामोर्तब झाले असते. तो कटू होऊ पाहणारा प्रसंग वैदुवाडीतील समंजस कार्यकर्त्यांनी टाळला. मयत शंकरच्या भावाने व त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या भूमिकेचेही कौतुकच व्हायला हवे.
या सर्वांच्या समंजसपणामुळे पोलिसांसमोरील बाका प्रसंग टळला आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे. वैदुवाडीतील अवैध सावकारकीच्या खोलात जाण्याची गरज आहे. वैदुवाडीसह सर्व सिन्नरकरांना पोलीस उपाधीक्षक तांबे यांनी शब्द दिला आहे. संशयितांना 24 तासांत पकडण्याबरोबरच या संपूर्ण घटनेला जबाबदार असणार्या सर्वांच्या मुसक्या आवळण्याचे काम त्यांनी केले तर सिन्नरकरांच्या मनात पोलिसांची प्रतिमा सुधारेल, त्यांच्यावरील विश्वास वाढेल आणि खर्या सिन्नरची शांतता अबाधित राहील.