सिन्नर: तालुका शेतकरी सल्लागार समिती गठीत

सिन्नर: तालुका शेतकरी सल्लागार समिती गठीत

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत 9Agricultural Extension Programme) शासन पुरस्कृत कृषीभुषन, वनश्री, शेतीनिष्ट, युवा, शेतकर्‍यांबरोबरच ज्यांनी शेती संलग्न प्रकल्पात (Agriculture related projects) प्रेरणादायी कार्य केले आहे,

अशा शेतकर्‍यांची (farmers) तालुका कृषी कार्यालयातील (Taluka Agriculture Office) सल्लागार समितीत (Advisory Committee) निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतीनी कोकाटे (Former Zilha Parishad member Simantini Kokate) यांची निवड करण्यात आली.

आत्मा नियम मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी (Collector) व पालकमंत्री (Guardian Minister) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात ही समिती गठीत करण्यात येत असते. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे (Taluka Agriculture Officer Annasaheb Gagare) व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश चौधरी (Taluka Technology Manager Nilesh Chaudhary) यांनी समितीचे कार्य व शेतकर्‍यांसाठी असणार्‍या विविध शासकीय योजनांची माहीती दिली.

अध्यक्ष कोकाटे यांनी शेती पुरक प्रक्रीया उद्योग आपल्या तालुक्यात कसे उभे करता येतील, शेतकर्‍यांपर्यंत शासकीय योजना (Govt Scheme) जलद गतीने कशा पोहोचतील यावर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांनी अतिवृष्टीने (heavy rain) नुकसान झालेल्या शेतीतील पंचनामे (panchanama) त्वरीत करुन त्ंयाचा अहवाल शासनास तातडीने पाठवण्याची सुचना अधिकार्‍यांना केली.

समितीत समाविष्ट शेतकरी

सिमंतीनी कोकाटे, रामहरी मोहन सुरसे, विनायक हौशीराम घुमरे,ज्ञानेश्वर विठ्ठल हारळे, विलास दिनकर देशमुख, मिननाथ हरी डावरे, भाऊसाहेब रामभाऊ खाडे, आनंदा रामनाथ काळुंगे, संदिप कुंडलिक लोणारे, योगेश निवृत्ती झगडे, संजय पिराजी लोढे, रमेश संपत रानडे, संजय निवृत्ती खैरनार, सुधाकर निवृत्ती गोरडे, योगेश भिवाजी आव्हाड, शेखर पोपटराव गोळेसर, राजाराम रामभाऊ मुरकुटे, बाळासाहेब कृष्णा भोर, सुदाम सिताराम बोडके, सुनिता नवनाथ गडाख, दशरथ वाळीबा रुपवते, दिपक तुकाराम जगताप, शरद नामदेव लहांगे, कचरु मगळु कुंदे यांची समितीत निवड करण्यात आली.

शेतकरी प्रशिक्षण, पीक प्रात्याक्षिके, शेतकरी शैक्षणिक सहल, शेतकरी समूह संघटन, शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादासाठी कार्यशाळा, क्षेत्रिय दिवस व किसान गोष्टीचे आयोजन, नव्या कृषि तंत्रज्ञानाचे व्यापक प्रमाणात विस्तार होण्यासाठी प्रचार व प्रसिध्दीची जोड, कृषि विस्तार कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी अशासकिय संस्थांचा सहभाग, कृषि विस्तार कार्यक्रमामध्ये महिलांचा अधिक सहभाग, पिके, फळे, फुले व भाजीपाला उत्पादन शेतर्‍यांचे समूह/गट तयार करुन त्यांच्यामार्फत कृषि विस्तार योजना शेतकर्‍यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेन

- सिमंतीनी कोकाटे, अध्यक्ष

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com