सिन्नर तालुक्याने ओलांडला 2 हजार रुग्णांचा टप्पा

सिन्नर तालुक्याने ओलांडला 2 हजार रुग्णांचा टप्पा

सिन्नर । Sinnar

तालुक्यात गेल्या तीन दिवसात ११० रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या २०४० झाली आहे.

तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात आता रुग्ण वाढू लागले असून एका-एका गावात कमीत कमी 5-10 रुग्ण आढळतांना दिसत आहे.

सिन्नर शहरातही एकही गल्ली करोना बाधींताशिवाय राहिलेली नाही. छोट्या-मोठ्या गल्लीतही करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतांना दिसत आहे.

शहरासह तालुक्यात करोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असून दररोज दोन ते तीन जणांचा करोनाने मृत्यू होत आहे.

कमी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या संख्येने असल्याने घरीच उपचार घेऊन बरे होण्याची संख्या वाढली आहे. ही तालुक्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब ठरत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com