सिन्नर: वडांगळीत कांदा लिलाव सुरू

पहिल्याच दिवशी 658 क्विंंटल आवक
सिन्नर: वडांगळीत कांदा लिलाव सुरू

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) वडांगळी (Vadangali) उपबाजारात सभापती विनायक घुमरे, उपसभापती सविता उगले यांच्या हस्ते कांदा लिलावास (Onion auction) नुकताच प्रारभं करण्यात आला. पहिल्याच दिवशी बाजारात 658 क्विंटल कांद्याची आवक झाली.

या उपबाजारात सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस कांदा शेतमालाचे लिलाव सुरु राहणार असून कांद्याचे लिलाव (Onion auction) झाल्यानंतर त्याच दिवशी शेतकर्‍यांना (farmers) रोख स्वरुपात पैसे अदा केले जात आहेत. पहिल्याच दिवशी पंचक्रोषीतील शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

658 क्विंटल आवक होवून किमान 1100, कमाल 1600 व सरासरी 1400 असे दर राहिले. कांदा शेतमालाची खरेदी (Purchase of onion farm produce) करण्यासाठी प्रविण वाघ, रामनाथ पानसरे, बाळासाहेब चव्हाणके, भुवनेश्वर सारंगधर, नितीन राजपुत, सागर दौंड या व्यापार्‍यांनी उपस्थित राहून कांदा खरेदी केला.

परिसरातील शेतकर्‍यांच्या (farmers) खुप दिवसांच्या मागणीला प्रतिसाद देत बाजार समितीने या उपबाजारात नव्याने जनावरांचा बाजारदेखील सुरु केला आहे. संचालक मंडळाच्या हस्ते या बाजाराचाही शुभारंभ झाला. गायी खरेदीसाठी शौकत शेख, भाऊसाहेब आव्हाड, मतिन शेख, उबेद शेख हे व्यापारी उपस्थित होते. वडांगळी उपबाजारात कांदा व जनावरांची खरेदी-विक्री सुरु झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांची गैरसोय दुर झाली आहे. त्यांचा वेळ, श्रम, वाहतुक खर्चदेखील वाचणार आहे.

यावेळी संचालक शांताराम कोकाटे, सुधाकर शिंदे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, सरपंच योगेश घोटेकर, भारत बोर्‍हाडे, सोपान उगले, आंनदा कांदळकर, सुदेश खुळे, रामदास खुळे, विक्रम खुळे, राहुल खुळे, नितीन खुळे, दत्तात्रय खुळे, समितीचे उपसचिव आर. एन. जाधव, व्ही. आर. उगले उपस्थित होते. शेतकर्‍यांनी आपली कुचंबना व नुकसान टाळण्यासाठी शेतमाल शिवार मापाने विक्री न करता वडांगळी उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा असे आवाहन सचिव विजय विखे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com