E-Salary App
E-Salary App |Primary Teachers Association
नाशिक

सिन्नर : शिक्षकांचा पगार आता एका क्लिकवर

पंचायत समितीत "ई- सॅलरी अँप" चे उद्घाटन

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे मासिक पगार करणाऱ्या ‘ई-सॅलरी अँप’चे आज (दि.4) गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके , वरिष्ठ सहाय्यक रंजन थोरमिसे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

या अँपमूळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन एकाच क्लिकवर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिली. सर्व शिक्षकांना या अँपमूळे घरबसल्या वार्षिक विवरण पत्रदेखील वर्षाकाठी उपलब्ध होणार आहे.

या अँपसाठी प्रत्येक शिक्षकांना वैयक्तिक आयडी व पासवर्ड दिला जाणार असल्यामुळे त्याची गोपनीयतादेखील राखली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दिलीप बिन्नर, अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव ललित सोनवणे, मिलिंद गांगुर्डे, सोमनाथ तेल्हुरे, तालुकाध्यक्ष संजय भोर यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com