पतसंस्था कर्मचार्‍यांना लस उपलब्ध करुन द्या!

पतसंस्था कर्मचार्‍यांना लस उपलब्ध करुन द्या!

जिल्हा फेडरेशनचे कार्याध्यक्ष वाजे; यांचे पालकमंत्र्यांना साकडे

सिन्नर । वार्ताहर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील, बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना लस देण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पतसंस्थांमध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना लस उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण वाजे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, बिगरशेती सहकारी पतसंस्थातील अधिकारी व कर्मचारी कोरोना योध्यासारखे गत वर्षापासून सेवा बजावत आहेत. ग्रामीण भागात पतसंस्था या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अर्थसहाय्य करत असते.

पैशाची देवाण-घेवाण, ठेवी स्वीकारणे, कर्जपुरवठा करणे इत्यादी महत्त्वाची कामे पतसंस्थांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी करत असतात. तेव्हा जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना लस मिळावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचा विचार करुन आरोग्य विभागास आदेश व्हावेत. ग्रामीण भागातील पतसंस्थांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांंचे लसीकरण व्हावे यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही साकडे घालण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com