पत्र्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

पत्र्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
देशदूत न्यूज अपडेट

सिन्नर | माळेगाव एमआयडीसीमध्ये काम करताना पत्र्यावरून पडून 50 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली....

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिन्नर मधील माळेगाव एमआयडीसी मधील शर्मा कंपनीमध्ये पत्राचे काम करत असताना पत्र्यावरून पडून अलीम खलील शेख (५५ ) निगल गल्ली, अंबड लिंक रोड, संजीव नगर, नाशिक यांच्या हाताला व कमरेला दुखापत झाल्याने त्यांना प्रथम सिन्नर येथील मातोश्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिन्नर पोलिस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com