सिन्नर : वाचनालय दोन तास उघडे राहणार
नाशिक

सिन्नर : वाचनालय दोन तास उघडे राहणार

Dinesh Sonawane

सिन्नर । कोरानाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच घरात बसावे लागणार असून यावेळी वाचकांना पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाने सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुस्तक वितरण कक्ष सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचकांनी गर्दी न करता या दोन तासात वाचनालयात यावे व आपल्याला आवश्यक ते पुस्तक घेऊन जावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:सह कुटुंबाची व शहराची काळजी घ्यावी असे आवाहन अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com