सिन्नर: आगसखिंड तलावाचे जलपूजन

सिन्नर: आगसखिंड तलावाचे जलपूजन

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील आगासखिंड (Agaskhind) येथील पाझर तलाव तुडुंब भरल्याने युवा मित्र संस्था व ग्रामस्थांच्यावतीने तलावाचे विधीवत जलपूजन (jalpujan) करण्यात आले.

युवा मित्र, टाटा ट्रस्ट (Tata Trust), ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन, घरडा केमिकल्स (Gharda Chemicals) व महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांच्या संयुक्त विद्यमाने या तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते.

जून महिन्यात गाळ काढून पूर्ण झाल्याने त्यानंतर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने (heavy rain) तलाव तुडूुंब भरला आहे. गाळ उपाशामुळे तलावातील पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या (farmers) सिचंनाचा प्रश्नही (irrigation issue) मार्गी लागला आहे. त्यामुळे युवा मित्र व ग्रामस्थांच्यावतीने या जलपूजन (jalpujan) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रा फाऊंडेशनच्या (Chandra Foundation) गायत्री लोबो, युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनिषा पोटे, रघुनाथ बरकले, बाबुराव मोजाड, माजी सरपंच दत्तू आरोटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. पोटे यांनी गाळ उपसा करण्यासाठी करण्यात आलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. गावात झालेले काम हे वाखण्याजोगे असून लोकांच्या चेहर्‍यावर हे चित्र प्रतिबिंबीत होत असल्याचे लोबो म्हणाल्या.

युवा मित्रसह गावातील शेतकर्‍यांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी सरपंच मिना आरोटे, उपसरपंच लहानु बरकले, दत्तू आरोटे, शिवाजी आरोटे, नामदेव आरोटे, भारत आरोटे, रंगनाथ आरोटे, हरिभाऊ बरकले, पांडुरंग शिंदे, बाबुराव मोजाड, पांडुरंग बेंडकुळे, देवीदास जगताप, मधुकर लहामगे, नितिन आरोटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com