सिन्नर ठरतोय करोनाचा हॉटस्पॉट; २४ तासात आढळले ‘इतके’ बाधित

सिन्नर ठरतोय करोनाचा हॉटस्पॉट; २४ तासात आढळले ‘इतके’ बाधित
करोना अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या २४ तासांत ग्रामीण भागात (Nashik Rural) करोनाचे (Corona) एकूण ८५ रुग्ण आढळून आले आहेत...

यामध्ये एकट्या सिन्नर तालुक्याचे (Sinnar Taluka) ३६ बाधित आहे. यामुळे सिन्नर पुन्हा एकदा करोनाचा हॉटस्पॉट (Corona hotspot) ठरत आहे. यामुळे पुन्हा करोना बाधित वाढतात का याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

शहरात (Nashik City) करोनाबाधितांची (Corona Positive) संख्या २४ तासात २६ असून ग्रामीण भागात ८५ नागरिक बाधित झाले आहेत. सध्या जिल्ह्यात (Nashik District) ९०४ नागरिक उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासात एकूण १२१ रुग्ण बाधित झाले तर ११५ रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. शहरात २६, ग्रामीण भागात ८५, तर मालेगावमध्ये (Malegoan) ०३ आणि जिल्हा बाह्य प्रत्येकी ०७ रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे आता जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ६ हजार ५७८ रुग्ण बाधित तर ३ लाख ९७ हजार ०१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज जिल्ह्यात १ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा मनपा कार्यक्षेत्रातील आहेत.

ग्रामीण आणि मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण दगावला नसून एकूण बळींची संख्या ८ हजार ६०२ इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com