सिन्नर : दापूरला विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

सिन्नर : दापूरला विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

सिन्नर । वार्ताहर

दापूर येथे 20 खाटांचे अद्ययावत विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिपक खुळे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, सरपंच रमेश आव्हाड, उपसरपंच ललिता आव्हाड आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना, कमी प्रमाणात लक्षणे आढळलेल्या रुग्णांना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यासाठी सर्व सुविधा असलेला विलगीकरण कक्ष उभा करणे गरजेचे होते. उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून सर्व सुविधा असलेला हा विलगीकरण कक्ष साकारण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.

ऑक्सिजन सुविधा असलेला कक्ष

या कक्षात तीन ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. 20 खाटा, वीज, पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था यात आहे. कक्षात राहणार्‍या गरजू व्यक्तींना जेवनाची सुविधाही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका या रुग्णांची देखभाल ठेवणार आहेत. गावातील संत निरंकारी मंडळाचे सेवेकरीही मदतीसाठी राहणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com