सिन्नरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर

उच्च न्यायालयाने दिले मंजूरीचे पत्र
Civil Court, Sinnar
Civil Court, SinnarSinnar Nashik

Sinnar

सिन्नर तालुक्यासाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्यास उच्च न्यायालयाने मंजूरी दिली असून तसे मंजूरीचे पत्र काल (दि.13) प्राप्त झाले असल्याची माहिती सिन्नर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अरुण गुरुळे यांनी दिली.

सध्या सिन्नरमध्ये प्रथम न्यायवर्ग दंडाधिकारी व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कार्यरत आहे. मात्र, या दोनही न्यायालयाच्या अखत्यारीत न येणाऱ्या बाबींसाठी वकिल व अशिलांना जिल्हा न्यायालयात नाशिकला धाव घ्यावी लागत होती. दाव्यांची वाढती संख्या पाहता येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून वकीलसंघाचा पाठपुरावा सुरु होता. त्यास यश आले असून या वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजूरी मिळाल्याने नाशिकला जाण्याचा त्रास कमी होणार आहे.

या नव्या न्यायालयामुळे हिंदू विवाह कायद्यांतर्गत येणारे सर्व दावे सिन्नरलाच चालू शकतील. तर पाच लाखांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या मालमत्तांबाबतचे दावेही सिन्नरला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारचे विरोधात दावा दाखल करण्यासाठी यापूर्वी नाशिकला जावे लागत होते. मात्र, या नव्या न्यायालयामुळे सिन्नरकरांना शासनाच्या विरोधात येथेच न्याय मागता येणार आहे.

नव्या वरिष्ठस्तर न्यायालयामुळे तालु्नयातील पक्षकार व वकिलांची मोठी गैरसोय दूर झाली असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव देशमुख, ॲड. राजेंद्र चव्हाणके, ॲड. पी. बी. चांदोरे, ॲड. विलास पगार, ॲड. जयंसिंह सांगळे यांच्यासह सर्व वकिलांनी स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com