सिन्नर: म्हाळुंगी बंधार्‍यासाठी कोटींचा निधी

सिन्नर: म्हाळुंगी बंधार्‍यासाठी कोटींचा निधी
USER

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील हिवरे येथे म्हाळुंगी नदीवर (Mahalungi river) बंधार्‍याच्या (dam) कामासाठी आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या प्रयत्नातून तब्बल 10 कोटी 62 लाखांचा निधी (fund) प्राप्त झाला असून यामुळे 141 हेक्टर शेतजमिन ओलिताखाली येणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

देवनदीवरील 5 व हिवरे येथील 1 अशा 6 मोठ्या बंधार्‍यांना मंजुरी मिळण्यासाठी आ. कोकाटे यांनी 2012-13 या साली प्रयत्न सुरु केले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून (District Annual Plan) या बंधार्‍यांना मंजुरी देण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली होती. तांत्रिक मंजुरीही मिळाली होती. वडांगळी व कीर्तांगळी येथील बंधार्‍यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र, देवनदीवरील उर्वरित बंधारे व हिवरे येथील तवलीच्या बंधार्‍यास पुढे सरकार बदलल्याने मंजुरी मिळू शकली नव्हती. राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर आ. कोकाटे यांनी चोंढी, निमगाव देवपूर, देवपूर येथील बंधार्‍यांची कामे सुरु केली.

वाढत्या महागाईमुळे (Inflation) मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हिवरे येथील तवलीच्या बंधार्‍याचे नव्याने अंदाजपत्रक बनवून ते सुधारित प्रस्तावासह जलसंधारण महामंडळाकडे (Water Conservation Corporation) मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्याच्या मंजुरीसाठी आ. कोकाटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु. पा. कुशिरे (Managing Director of Water Conservation Corporation S. P. Kushire) यांनी नुकतीच त्यास प्रशासकीय मंजूरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या दालनात तालुक्यातील जलसंधारण विभागातंर्गतच्या (Department of Water Resources) योजनांना गती देण्यासाठी आ. कोकाटे यांच्या आग्रहाखातर बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपमुख्यमंत्री पवार, जलसंधारण मंत्री शंकर गडाख (Water Conservation Minister Shankar Gadakh), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharne) यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. कोकाटे यांनी मतदार संघातील दुष्काळी स्थिती व त्यामुळे प्रस्तावित योजनांना मंजुरी देण्यासाठीची आवश्यकता उपस्थितांसमोर मुद्देसूद मांडल्याने ना. पवार यांनी या प्रस्तावांना मंजुरी देत त्यासाठी पैसे उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. त्यातून हिवरे येथील तवलीची योजना मंजूर झाली आहे. सदर योजना म्हाळुंगी नदीवर असून गोदावरी खोर्‍यात या नदीचे पाणी जात असल्याने त्यासाठी पाणी परवानगी गरजेची होती. तथापि, आ. कोकाटे यांनी 2013 मध्येच यासाठी पाणी परवानगी मिळविली असल्याने या योजनेस मंजुरी मिळू शकली.

चार गावांना फायदा

520 द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या या बंधार्‍यामुळे प्रत्यक्षरीत्या 141 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असले तरी भूगर्भातील पाणी पातळी वाढून पिंपळे, पाडळी व टेंभूरवाडी या गावांच्या सिंचनातही वाढ होऊ शकणार आहे. त्यातून या भागातील पीकपध्दतीतही बदल होणार आहे. या कामासाठी मंजूर 10 कोटी 61 लाख 52 हजारातून भूसंपादनासाठी 8 लाख 63 हजार, पाणी वापर संस्थेच्या खोलीसाठी 3 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. बंधार्‍याच्या बाजूने वृक्षारोपण होणार आहे. इतर किरकोळ खर्च वगळता 9 कोटी 53 लाख 88 हजार इतका निधी बंधार्‍यासाठी वापरण्यात येणार आहे. लवकरच या कामाची टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

शेतकरी महत्त्वाचे शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असून शिवार रस्ते, पूरचार्‍या व बंधारे या कामांना आपण मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत असून अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. खरं तर माझ्या आमदारकीच्या तिसर्‍या टर्म वेळीच हिवरेच्या या बंधार्‍याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. दुर्दैवाने त्यावेळी ते मंजूर झाले नाही. मात्र, आता हे काम मंजूर झाल्याने या भागातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

- माणिकराव कोकाटे, आमदार

Related Stories

No stories found.