सिन्नर :  नितीन शेवगावकर यांचे निधन
नाशिक

सिन्नर : नितीन शेवगावकर यांचे निधन

भैरवनाथ पतसंसस्था, माजी व्यवस्थापक

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर येथील भैरवनाथ पतसंस्थेचे माजी व्यवस्थापक नितीन नारायण शेवगावकर (वय ५९) यांचे आज १९ जुलै रोजी दुपारी बाराच्या दरम्यान निधन झाले. चार दिवसांपासून शेगावकर यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. छातीचा एक्स-रे काढल्यानंतर करोना संसर्गाची शंका व्यक्त करत खासगी डॉक्टरांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, इतर कुठलीही लक्षणे दिसत नसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार घेण्याची सूचना केली. काल शनिवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर ते उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा आले होते. येथे त्यांची लाळ तपासणीसाठी घेण्यात आली. मात्र,त्यांची ऑक्सिजन लेवल खूपच खाली आल्याचे दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने नाशिक येथे जाण्यास सांगितले.

काल दिवसभर नाशिक शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, मविप्र हॉस्पिटल सह सर्व हॉस्पिटलमध्ये जाऊनही कुठेही बेड मिळत नसल्याने रात्री ते पुन्हा घरी परतले होते. लोणी येथील विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आज दुपारून त्यांना बेड मिळणार होते. मात्र, त्यापूर्वीच आज सकाळी त्यांची तब्येत अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन होण्यापूर्वीच त्यांचे वडील नारायण शेवगावकर वय ८६ यांचेही आज सकाळीच सरदवाडी रोडवरील राहत्या घरी निधन झाले.

Deshdoot
www.deshdoot.com