करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

सिन्नर : आठवा बाधीत दगावला

शहरात नवे १६ ; ग्रामीण भागात १५ रुग्ण

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

‘करोना’ महामारीने तालुक्यात हातपाय पसरले असून लोंढे गल्लीतील ५९ वर्षीय महिलेचा नाशिक येथे उपचार सुरु असतांना मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात ‘करोना’ने मृत झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. काल शहरात नवे १६ रुग्ण तर ग्रामीण भागात नवे १५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यात आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. त्यातील १८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ९० रुग्णांवर येथील उपजिल्हा रुग्णालय व नाशिकच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

शहरातील ५९ वर्षीय करोना बाधित महिलेचा मंगळवारी रात्री साडे बारा वाजता नासिक येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. काल सकाळी ९.३० वाजता नासिक येथील अमरधाममध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात करोना संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८ झाली आहे.

सिन्नर शहरात आज नव्या १६ रुग्णांची वाढ झाली आहे. विजय नगर मध्ये आधी निघालेल्या रुग्णाची पत्नी वय ४६ वर्ष, त्याच कुटुंबातील ३० वर्षीय महिला, पाच वर्षाचा मुलगा, ७ वर्षाची मुलगी यांना करोनाची लागण झाली आहे. गंगावेस येथील ८६ वर्षीय ज्येष्ठ महिला, सोनार गल्लीतील ५३ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहेत. सरदवाडी रोड येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या पॉझिटिव रुग्णाची दहा वर्षाची मुलगी व २८ वर्षाची वहिनी पॉझिटिव्ह आले आहेत. गंगावेस भागात ५२ वर्षीय पुरुष, रेणुका नगरमध्ये ३२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह निघाले आहेत.

रेणुका नगरमधील युवक हा मुंबईत नोकरीला असून दहा-बारा दिवसापासून तो कुटुंबीयांसह रेणुका नगरला आई-वडिलांकडे आला आहे. शहरातील नवनाथ नगरमध्ये यापूर्वीच एक रुग्ण पॉझिटिव्ह निघालेला असून त्याच्या कुटुंबातील चार व्यक्ती पॉझिटिव असल्याचा रिपोर्ट आला आहे. त्यात ३२ वर्षीय व ३५ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला व पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे. लोंढे गल्लीत काल ८० वर्षाच्या महिलेचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

पांढुर्लीत एकाच दिवशी १३ पॉझीटीव्ह

तालुक्यातील पांढुर्ली येथे काल १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ४ महिला, ६ पुरुष, एक दीड वर्षांचा मुलगा, ७ वर्षांची मुलगी व ११ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर ब्राम्हणवाडे व दापूर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com