सिन्नर: शिंदे टोलनाका बंद करण्याची मागणी

गडकरी यांच्याकडे खा.गोडसे यांचे साकडे
सिन्नर: शिंदे टोलनाका बंद करण्याची मागणी

सिन्नर । प्रतिनिधी Malegaon

नाशिक-सिन्नर महामार्गावर (Nashik-Sinnar Highway) शिंदे टोलनाक्यावर (Shinde Toll Naka) स्थानिकांकडून टोल वसूल (Toll collection) केला जात असून दररोज ये-जा करण्यार्‍यांना टोल भरणे परवडत नाही.

त्यामूळेे शिंदे टोल प्लाझा (toll plaza) तातडीने बंद करावा अशी मागणी खासदार हेमंत गोडसे (mp hemant godse) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari) यांना निवेदन (memorandam) देत केली आहे.

सिन्नर नगर परिषदेच्या (Sinnar Municipal Council) हद्दीपासून हा टोल प्लाझा अवघ्या सहा किमी तर नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) हद्दीपासून अवघा पाच किलो मीटर अंतरावर आहे. सिन्नरपासून नाशिक शहर अवघे पंचवीस किमी असल्याने नोकरी (job), शिक्षण (education) आणि हॉस्पिटलायझेशनच्या (Hospitalization) कामांसाठी सिन्नर (sinnar) येथील शेकडो वाहने दररोज टोल नाक्यावरुन ये-जा करत असतात.

इतक्या कमी अंतरासाठी टोल द्यावा लागत असल्याने नाशिक व सिन्नर येथील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यात टोल प्रशासनाकडून वाहनधारकांना हव्या तशा सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे हा टोल नाका तातडीने रद्द करावा अशी मागणी खा. गोडसे यांनी निवदेनात केली आहे.

टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिघातील वाहन धारकांना 250 रूपयांचा पास सक्तीचा असून या परिघातील शिंदे औद्योगिक वसाहत (Industrial estate), ब्राम्हणवाडे, मोहगाव, पळसे, चिंचोले, वडगाव या गावांमधील लोकसंख्या सुमारे 15 लाखांच्या घरात आहे. सिन्नर शहरातील शेकडो वाहनधारकांना दररोज विविध कामांसाठी शहरात ये-जा करावी लागते. त्यामुळे वीस ते पंचवीस किमी अंतरासाठी रोजच टोल भरावा लागत असल्याने स्थानिक वाहन धारकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

याबरोबर या टोलपासून पुढे अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर संगमनेर शिवारात पुन्हा दुसरा टोल आहे. यामुळे वाहनधारकांना पन्नास किलोमीटर अंतरावर दोनदा टोल भरावा लागत असल्याने नाशिक शहरातील वाहन धारकांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे शिंदे टोल प्लाझा तातडीने रद्द करावा अशी मागणी खा. गोडसे यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही ना. गडकरी यांनी खा . गोडसे यांना दिली आहे.

हिवरगाव टोल प्लाझात विलीनीकरण करा

शिंदे टोल प्रकल्पाची किंमत 312 कोटी असून पैकी 192 कोटींचा कंत्राटदाराचा खर्च होता. त्यामुळे संगमनेरमधील हिवरगाव शिवारातील टोल प्लाझामध्ये शिंदे टोल प्लाझाचे विलनीकरण केल्यास आर्थिक नुकसान होणार नाही. शिवाय सिन्नर-घोटी, सिन्नर-शिर्डी, समृध्दी व सुरत-चेन्नई हे रस्तेही याच टोल प्लाझावरून जात असतात.

त्यामुळे शिंदे टोल प्लाझाचे संगमनेर येथे टोल प्लाझात विलनीकरण झाल्यास नाशिक आणि सिन्नर या दोन्ही शहरांमधील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे . शिंदे टोल प्रशासनाच्या मनमानी कारभाराविषयी नाशिक आणि सिन्नर येथील वाहनधारकांकडून आलेल्या तक्रारीं गंभीर स्वरूपाच्या असून वेळीच दखल न घेतल्यास कोल्हापूर येथील टोल प्लाझासारखी परिस्थिती उद्भवू शकेल असे स्पष्ट करत खा. गोडसे यांनी शिंदे टोल प्लाझा विषयीचे गांभिर्य गडकरी यांच्या लक्षात आणून दिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com