सिन्नर : डाळिंब बाग नुकसान भरपाई द्या
नाशिक

सिन्नर : डाळिंब बाग नुकसान भरपाई द्या

शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

Abhay Puntambekar

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी डाळिंब बागांचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्यात येत आहे. नुकसानग्रस्तांना विमा रक्कम मिळावी यासाठी सिन्नर तालुका शेतकरी संघटनेने तहिसलदार राहुल कोताडे यांना निवेदन देत शेतकर्‍यांवरील अन्यायाकडे लक्ष वेधले आहे.

खरीप हंगाम सन २०१९ मध्ये इन्श्युरन्स डाळींब बाग शेतकर्‍यांनी काढला होता. या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे संपुर्ण बागेचे १०० % नुकसान झाले होते. तसे पंचनामे सुध्दा झाले होते. शासन दरबारी त्याचे रेकॉर्डसुध्दा झाले होते. मात्र, इन्श्युरन्स कंपनीने शेतकर्‍यांस एकही रुपया दिला नाही व शेतकर्‍यांचे पुर्ण वार्षिक उत्पन्न बुडाले.

परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला. इन्श्युरन्स कंपनीला काहीही फरक पडला नाही व आता परत नविन इन्श्युरन्स काढण्यासाठी जाहिरात चालू आहे. सर्व शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीचा इन्श्युरन्स त्वरित कंपनीने शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, रमेश पगार, शांताराम पगार, बारकु पगार आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com