सिन्नर । वार्ताहर

सिन्नर-पूणे महामार्गावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील गोडाऊनला आज (दि.11) दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले जुने दस्तऐवज जळाले असून अग्निशमन दलाच्या बंबांनी आग आटो्नयात आणल्याने मोठा अनर्थ टळला...

गावठा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून या कार्यालयाच्या पाठीमागे गोडाऊन आहे.

या गोडाऊनमध्ये जुने दस्तऐवजांसहे अडगळीतले भंगार पडलेले आहे. या गोडाऊनच्या खिड्नया वेल्डींग पॅक करण्यात येत असतांना अचानक वेल्डींगच्या थिणग्या उडून कागदपत्रांनी पेट घेतला.

धूराचे लोळ निघू लागल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तातडीने विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत मात्र काही अंशी कागदपत्र जळाली आहेत.

उपविभागीय अभियंता प्रवीण भोसले यांच्याशी संपर्क साधला असता गोडाऊन मधील जुने फर्निचर साहित्य काहीअंशी जळाल्याचे त्यांनी सांगितले.