सिन्नर: भाजप शहर कार्यकारिणी जाहिर

सिन्नर: भाजप शहर कार्यकारिणी जाहिर

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

भाजपा (BJP) शहर मंडळच्यावतीने शासकीय विश्रामगृहावर नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत (Review meeting) शहराची नुतन कार्यकारिणी जाहिर (New executive announced) करण्यात आली. शहरातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan) राबवण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष बाळासाहेब हांडे (Information Board Chairman Balasaheb Hande) यांनी दिली. नगर परिषद (nagar prishad) निवडणूकीच्या (election) पार्श्वभूमीवर हांडे व जेष्ठ नेते रमेश दराडे यांनी नुतन कार्यकारणी जाहीर केली.

शहर उपाध्यक्षपदी डॉ. संपत चव्हाण, डॉ. सुरेश बिडवई, अतुल गुजराथी, अरुण पाबळे, सजन सांगळे, हितेश वर्मा, शहर सरचिटणीस विशाल क्षत्रिय, सागर सोमाशे, युवा मोर्चा अध्ंयक्षपदी सचिन गोळेसर, ओबीसी आघाडी अध्यक्षपदी मुकूंद खर्जे, वाहतूक आघाडीपदी आकाश खर्जे, एन. टी. आघाडीपदी नाना बाबर, अनुसूचित जाती आघाडीपदी डॉ. सचिन गायकवाड, वैद्यकिय आघाडीपदी दीपक काळे, महिला आघाडीपदी उषा कराड,

युवा मोर्चा आघाडीपदी संतोष चव्हाण, अध्यात्मिक आघाडीपदी दत्तात्रय आचार्य, सोशल मीडिया अध्यक्षपदी धंनजय रहाणे यांची निवड करण्यात आली. यावेळी सागर सोनवणे, प्रमोद उगले, संतोष कमळू, गणेश क्षीरसागर, रवी नाठे, शिवाजी आव्हाड, चंद्रकला सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com