जन्मदिनीच सिन्नर भूषण त्र्यंबकबाबा भगत यांचे निधन

जन्मदिनीच सिन्नर भूषण त्र्यंबकबाबा भगत यांचे निधन

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नरकरांचे भूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक त्र्यंबक बाबा भगत (Trimbakbaba Bhagat) (वय 89) यांचे आज पहाटे 5 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले....

गेल्या 4-5 दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यस्वस्थ बनली होती. आज पहाटे भैरवनाथ महाराज मंदिरातील काकड आरती सुरु होत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, नातू व संपूर्ण महाराष्ट्र भर हजारो भक्तगण असा परिवार आहे. आजच त्यांचा वाढदिवस होता.

सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरात श्री हरिनाम सप्ताहाचे त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 44 वर्षांपासून आयोजन करण्यात येते.तर तळ्यातील भैरवनाथ मंदिरात 60 वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

हे दोन्ही धार्मिक सोहळे तालुक्या सह जिल्ह्यातील भक्त गणासाठी पर्वणी मानले जातात. तालुक्यातील प्रत्येक धार्मिक सोहळा त्रंबक बाबा यांच्या शिवाय होतच नव्हता. सकाळची काकड आरती अनेक वर्षांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरु झाली.

कोविड मुळे दिड वर्षा पासून त्यात खंड पडला होता. भैरवनाथ मंदिर, मोठा गणपती यासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने त्यांचा सिन्नर भूषण (Sinnar Bhushan) पुरस्कार देऊन गौरव केला होता. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com