सिन्नर : चास येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन

सिन्नर : चास येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील चासचे Chas - Sinnar माजी सरपंच बंडूनाना भाबड यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत गावातील विविध विकासकामांचे भूमीपूजन development works Bhumipujan करण्यात आले. यावेळी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दत्त गिरी महाराज यांच्या हस्ते मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.भाऊसाहेब थोरात अभ्यासिका, लोकनेते स्व. तुकाराम दिघोळे वाचानलय व भोजापूर खोर्‍याचे भूषण स्व. मारुतीदादा दराडे व्यायाम शाळेचे व माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारण्यात आलेल्या माजी विद्यार्थी भवनचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवारUnion Minister of State for Health Dr. Bharti Pawar यांच्या हस्ते करण्यात आले.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या हस्ते तालुक्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ किर्तनकारांचा सत्कार करण्यात आला. महाराजांचे यावेळी किर्तनही झाले. यावेळी शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. त्यात खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते भाबड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी केरू भाबड, उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, उपसभापती संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्या संगिता पावसे, उद्योजक हेमंत नाईक, बाजीराव दराडे, नगरसेवक प्रशांत दिवे, नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक शैलेश नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अ‍ॅड. राजाभाऊ चव्हाणके, सुनिल बच्छाव,जयंत आव्हाड, बाळासाहेब हांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com