
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sinnar APMC) सभापती, उपसभापती निवडणुकीला सुरुवात झाली आहे. सभागृहात सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारात तणाव दिसून येत आहे. शाब्दिक चकमक उडाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले...
त्यामुळे आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रचंड उन्हाच्या तडक्यातही दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आहे.
विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला नऊ जागा तर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याही नेतृत्वाखालील पॅनलला नऊ जागा मिळालेल्या होत्या. कोकाटे गटाची एक सदस्य वाजे गटाच्या गळाला लागल्याने सभापती, उपसभापती निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे.