सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांना हक्काच्या इमारती

सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांना हक्काच्या इमारती

सिन्नर। Sinnar (प्रतिनिधी)

बर्‍याच प्रतीक्षेनंतर सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांना हक्काच्या इमारती मिळणार असून प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने दोन्ही पोलीस ठाणे इमारती सिन्नर शहरातच असणार आहे.

या इमारतींचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 13) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे उपस्थित असतील.

यासाठी अपर पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावकर, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी सेवक प्रयत्नशील आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com