करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

सिन्नर : राखीव पोलीस दलाचे ३० जवान शहरात दाखल

विनाकारण फिरणारे, मास्क न लावता फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई

Abhay Puntambekar

सिन्नर । विलास पाटील Sinnar

सिन्नर शहर प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन १४ दिवसांसाठी प्रांताधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केल्यानंतरही तिसऱ्या दिवशी घराबाहेर पडणारे कमी होत नसल्याने जिल्ह्यातील राखीव पोलीस दलाचे ३० जवान शहरात दाखल झाले असून उद्यापासून हे जवान शहरात तैनात करण्यात येणार असल्याचे समजते.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना वाढत्या करोनाचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी केले आहे. प्रशासनाने आज (दि.२३) देखील नियमांची कडक अंमलबजावणी करत धडक कार्यवाही सुरु ठेवली आहे.

कालप्रमाणे आजही रस्त्याने विनाकारण फिरणारे, मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रति व्यक्ती २०० प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. दुचाकीवर डबल सिट, चार चाकी गाडीमध्ये ३ पेक्षा जास्त प्रवासी घेऊन फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज दिवसभरात ५६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com