गायक डाॅ.रानडे
गायक डाॅ.रानडे
नाशिक

गायक डाॅ.रानडे यांना आर्टिस्ट अँप्रेसिएशन अवॉर्ड घोषित

२५ जुलैला पुरस्काराचे वितरण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिकचे प्रसिध्द शास्त्रिय संगीत गायक डाॅ.आशिष रानडे यांना अमेरिकेमधील 'आयसीएमए' या संस्थेकडून आर्टोस्ट अँप्रेसिएशन अवॉर्ड हा संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.

या पुरस्कारासाठी जगभरातील विविध देशातून युवा कलाकारांच नाॅमिनेशन झाले होते. या शर्यतीत डाॅ.रानडे यांची निवड करुन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. येत्या २५ जुलैला भारतीय वेळेनूसार रात्री ८.३० ते ११ हा पुरस्काराचे वितरण केले जाणार असून आयसीएमए फाऊंडेशनच्या युटयूब चॅनेलवर हा सोहळा प्रसारित केला जाणार आहे.

प्रसिध्द गायक महेश काळे हे डाॅ.रानडे यांच्याशी संवाद साधणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com