जिल्ह्यातील गोठे, गोवर्गीय जनावरांच्या परिसराची होणार एकाचवेळी स्वच्छता

जिल्ह्यातील गोठे, गोवर्गीय जनावरांच्या परिसराची होणार एकाचवेळी स्वच्छता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात जनावरांमधील लंपी (Lumpy) आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषद (Zilla parishad) पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रम आणि लसीकरण (Vaccination) मोहीम यांसह प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत...

जिल्ह्यातील एकूण आठ लाख ९५ हजार पन्नास गोवर्गीय जनावरे असून यापैकी आठ लाख ४० हजार तीनशे ९३ जनावरांचे (९३.८८%) लसीकरण पूर्ण झाले आहे. जनावरांमधील लंपी हा आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने व बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्काने होतो.

त्यामुळे या आजाराच्या नियंत्रणासाठी गोठ्यांची साफसफाई, गोचिड, डास, बाह्य कीटकांचे निर्मूलन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांच्यावतीने देण्यात आले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ विष्णू गर्जे यांनी केलेल्या आवाहनानुसार पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 2 गिरणारे ता जि नाशिक येथे डाॅ भगवान पाटील यांच्या उपस्थितीत गोठे स्वच्छ व निर्जंतुक करण्यात आले

यालाच अनुसरून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली असून दिवाळीपूर्वी वसुबारस सणाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर हा स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात पशुपालन हा हमखास उत्पन्नदेणारा व्यवसाय आहे त्यामुळे गोवर्गीय जनावरांची संख्या देखील मोठी आहे. वसुबारस सणाच्या दिवशी गाय व वासराची पूजा करण्याची पद्धत ग्रामीण भागात रूढ आहे याच दिवशी आपल्या गोवर्गीय जनावरांना लंपी आजाराची लागण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर हा स्वच्छ करण्यात येणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याने लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरणार आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विष्णुपंत गर्जे यांनी दिली.

जिल्ह्यातील गोठे, गोवर्गीय जनावरांच्या परिसराची होणार एकाचवेळी स्वच्छता
Video : सिन्नर तालुक्यात पावसाचा कहर; शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

एकाचवेळी स्वच्छता का?

लंपी हा आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने होतो या कीटकांचा वावर हा सर्वत्र असतो एका ठिकाणी निर्जंतुकीकरण केल्यास त्याभागातून दुसऱ्या ठिकाणी कीटक, गोमाश्या, गोचिड यांचा प्रसार होण्याची शक्यता असते. यासाठी ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश हा एकाचवेळी सर्व ठिकाणी स्वच्छता असा आहे.

जिल्ह्यातील गोठे, गोवर्गीय जनावरांच्या परिसराची होणार एकाचवेळी स्वच्छता
येवल्यात पावसाचा हाहाकार, अनेक घरांमध्ये शिरले पाणी; पाहा व्हिडीओ...

कशाने करावी स्वच्छता?

गोठे व जनावरांचा वावर असलेल्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी

1) Liq. Amitraz for dip,spray 12.5% dip concentrate

2) Liq. Deltamethrin EC १२.५%,

3) Liq. Cypermethrin १०%

प्रमाण – जनावरांच्या अंगावर पाण्यातून फवारणीसाठी मात्रा २ मि.ली. / प्रति लिटर

रिकाम्या गोठ्यात पाण्यातून फवारण्यासाठी ४मि.ली. / प्रति लिटर

या प्रमाणात वापर करण्यात यावा अशा सूचना ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com