
इंदिरानगर | वार्ताहर
नाशिक येथे सकल हिंदू समाजाने (Hindu Community) आयोजित केलेल्या लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधात आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा तसेच गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी विराट हिंदू मूक मोर्चास (Hindu Silent March) पाथर्डीतून सुरुवात झाली असून मोर्चात पाथर्डी गाव परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले आहेत...
सकाळी नऊ वाजता पाथर्डी (Pathardi) गाव मारुती मंदिरापासून दुचाकीवर सहभागी झालेले सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्रित आले असून पाथर्डी फाट्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याजवळ एकत्रित आले. त्यानंतर या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या. तसेच मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या.
दरम्यान, यावेळी गणेश ठाकूर, गोकुळ अनर्थ, जितेंद्र चोरडिया, एकनाथ नवले, गिरीश जोशी, विजय ढेमसे, नवीन जोशी, दीपक देव, निखिल जोशी, किरण वाजे, संदीप उगले, विजय चौधरी, कविता आरती, अरुणा थेटे, स्वाती जोशी, मनीषा ढेमसे, कल्पना घोलप, सोनारी लोहार, यांच्यासह आदी सहभागी झाले आहेत.