'या' कारणामुळे गुजरात सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचा मूक मोर्चा

'या' कारणामुळे गुजरात सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचा मूक मोर्चा

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

गुजरात (gujrat) दंगलीत महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार (sexual abuse) करणार्‍या 11 जणांची गुजरात सरकारने (Gujarat Govt) नुकतेच सुटका केली आहे या निर्णयाचे शहरात संतप्त पडसाद उमटले असून

पीडित महिलेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ तसेच सुटका केलेल्या आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी महानगर काँग्रेस (Congress) तर्फे तोंडाला काळे कपडे बांधून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा (march) काढण्यात येऊन स्त्री व निदर्शने केली गेली यावेळी संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गुजरात सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

गुजरात राज्यात (Gujrat State) उसळलेल्या जातीय दंगलीत (riot) बिलकीस बानो या महिलेवर 11 जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang sexual abuse) केला होता या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटल्याने पोलिसांनी (police) अत्याचार करणार्‍या 11 जणांना अटक केली होती मात्र काही दिवसापूर्वी गुजरात सरकारने या 11 आरोपींची सुटका केली आहे या निर्णयाचा सर्वत्र त्रिव विरोध केला जात आहे.

गुजरात सरकारचा हा निर्णय पीडित महिलेवर अन्याय करणारा ठरला असल्याचा आरोप करीत महानगर काँग्रेस (congress) तर्फे शहराध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा काढण्यात आला किदवाई रोडवरील काँग्रेस भवनापासुन या मोर्चात प्रारंभ केला गेला किदवाई रोड, डाँ आंबेडकर पुल,

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसम पूल कॅम्प रोड मार्गे हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला मोर्चात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे कापड बांधून हातात निषेधाचे फलक व झेंडे घेतले होते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष एजाज बेग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या धोरणावर तसेच गुजरात सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली एकीकडे पंतप्रधान मोदी बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देतात महिलांचे रक्षण व सन्मान झाला पाहिजे असे सांगतात मात्र दुसरीकडे त्यांच्याच राज्यात व पक्षाचे सरकार असलेल्या गुजरातेत महिलेवर सामूहिक अत्याचार करणार्‍यांना सोडले जाते हा प्रकार देशातील जनतेची दिशाभूल करणारा व महिलांवर अन्याय करणारा ठरला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग पंतप्रधान मोदी करत असल्याचा आरोप बेग यांनी यावेळी बोलताना केला पीडित महिलेवर झालेल्या अन्यायाच्या निषेर्धात व सुटका केलेल्या 11 जणांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी काँग्रेस तर्फे मूक मोर्चा काढण्यात आला आहे या मागणीची दखल न घेतल्यास काँग्रेस तर्फे त्रिव स्वरूपाचे आंदोलन (agitation) हाती घेतले जाईल असा इशारा बेग यांनी शेवटी बोलताना दिला.

या मूक मोर्चात ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ मंजूर हसन अयुबी, जमील क्रांती, महिला आघाडी अध्यक्ष अनिता अवस्थी, इमरान राशीद , हाशीम अन्सारी, शेख अख्तर, जैनुल आबेदीन पठाण, ऐतशाम शेख, निहाल फायबर, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते यावेळी मोर्चेकर्‍यांतर्फे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com