नाशिकचे विमान सेवा सुरळीत होण्याचे संकेत

नाशिकचे विमान सेवा सुरळीत होण्याचे संकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय मंत्री शिंदे (Union Minister Shinde) यांनी दिलेल्या निर्देशानुसार जानेवारीपासून 'स्टार एअर' (Star Air) ची नाशिक- बेळगाव विमानसेवा (Nashik-Belgaon Airline) पूर्ववत होणार असून, 'अलायन्स एअर' (Alliance Air) ला कालावधी वाढवून दिला जाणार आहे. तसे झाल्यास नाशिक (nashik)-दिल्ली (delhi), नाशिक-अहमदाबाद, नाशिक-पुणे व नाशिक- हैदराबाद या सेवा पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत. समाधान व्यक्त केला आहे

बेळगावदरम्यान जानेवारीपासून विमानसेवा (Airlines) नाशिकहून (nashik) अहमदाबाद (Ahmedabad) व पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी टू जेट, तर बेळगावसाठी स्टार एअरने विमानसेवा सुरू केली होती. टू जेटने आपली सेवा बंद केली, तर अलायन्स एअर व स्टार सेवा अचानक खंडित केली आहे. यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला धक्का बसणार असून, या योजनेला दोन वर्षे मुदत वाढवून द्यावी.

आशयाची मागणी विमान कंपन्या द्वारे करण्यात आली होती त्यांच्या या पत्राला उत्तर देताना केंद्रीय मंत्री शिंदे (Union Minister Shinde) यांनी नाशिक- बेळगाव सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, ती सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले जानेवारीपासून ती पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अलायन्स एअरने १ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक- अहमदाबाद, नाशिक- हैदराबाद, तर २७ ऑक्टोबर २०१९ रोजी नाशिक-पुणे अशी उड्डाणे सुरू केली.

कंपनीचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र, करोना साथीमुळे मधल्या काळात विमानांचे उड्डाणच होऊ शकले नाही. त्यामुळे या कंपनीला हा कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याचे शिंदे यांनी कळविले आहे. त्यामुळे या सर्व सेवा लवकरच सुरू होती अशी आशा व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या पत्रानुसार, जानेवारीपासून 'स्टार एअर ची नाशिक- बेळगाव विमानसेवा पूर्ववत होणार असून, 'अलायन्स एअर ला कालावधी वाढवून दिला जाणार आहे. तसे झाल्यास नाशिक-दिल्ली, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-पुणे व नाशिक- हैदराबाद या सेवा पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com